बाभूळगाव आयटीआय येथे संविधान मंदिराचे प्रतिकात्मक उद्दघाटन.
दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा :
शासनाच्या कौशल्य विकास विभागाच्या वतीने संविधान मंदिराच्या उद्घाटनाचा कार्यक्रम मा. उपराष्ट्रपती जगदिशजी धनखड यांचे शुभहस्ते आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाच्या निमित्ताने १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण झालेल्या एलफिन्स्टन आयटीआय, मुंबई येथे संपन्न झाला. याच कार्यक्रमाचे प्रतीकात्मक उदघाटन औद्योगिक प्रशिक्षण संस्था बाभूळगाव येथे करण्यात आले. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक प्रकाशचंद छाजेड यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले.
राज्यातील ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये १५ सप्टेंबर रोजी एकाचवेळी हा कार्यक्रम ऑनलाईन स्वरूपात आयोजित केला गेला. या उदघाटन कार्यक्रमास औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य विशाल मिलमिले, चुडामन मदारे, संजय खोडे, प्रसाद यवतीकर, नितीन महालगावे, ऍड. मिलिंद दातार, आय टी आय मधील तंत्र निदेशक, आजी -माजी विद्यार्थी, पालक व संविधानाची जाण असणारे समाजसेवक व स्थानिक नागरिक उपस्थित होते.