बाभूळगाव आयटीआय येथे रोजगार मेळावा – २१ सप्टेंबरला केले आयोजन
दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा :- (बाभूळगाव):
युवकांना कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन विविध योजना राबवित आहेत. शासनाच्या कौशल्य विकास विभागाच्या वतीने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत दिनांक २१/०९/२०२४ रोजी सकाळी ११. ०० वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बाभुळगाव या संस्थेत रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये “कार्य प्रशिक्षणार्थी” म्हणून निवड करण्याकरीता विविध खाजगी आस्थापना शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बाभुळगाव या संस्थेत उपस्थित राहणार आहे. या मेळाव्या करीता शासन निर्णया नुसार उमेदवारांची पात्रता : उमेदवार महाराष्ट्राचा अधिवासी असावा, उमेदवाराचे वय १८ ते ३५ असावे, उमेदवार १२ वी पास/ आय टी आय/पदविका /पदवी/पदव्युत्तर असावा व शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागास पात्र असणार नाही. सर्व स्थानिक बेरोजगार उमेदवारांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत आयोजित रोजगार मेळाव्या मध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन प्राचार्य विशाल मिलमिले, आय टी आय बाभुळगाव यांनी केले आहे.