शेकडो शेतकरी बैलगाडी आणि ट्रॅक्टर घेऊन मोर्चात सहभागी.
कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघातच निघाला शेतकऱ्यांचा हक्क मोर्चा..
दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा : (परळी। बीड)
१.पिक विमा आणि सातबारा कोरा करा.
२.शेतकरी कर्जमुक्त करा
३.रखडलेला पिक विमा तात्काळ द्या..
४.शेतकऱ्याच्या सोयाबीन सात हजार आणि कापसाला दहा हजार भाव द्या.
अशा अनेक हक्काच्या मंगण्यासाठी कृषिमंत्र्यांच्या परळीत शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्र घेत येथील स्थानिक तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढत विरोध दर्शविला आहे.यावेळी शेकडो ट्रॅक्टर व बैलगड्यांसह हजारो शेतकरी तसेच सर्वपक्षीय नेते सुद्धा या मोर्चात सहभागी झालेले दिसून येत आहेत.महाराष्ट्राचे कृषिमंत्री मा.धनंजय मुंडे यावर काय तोडगा काढतील यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.