Homeमहाराष्ट्रकामगारांच्या उपोषणाच्या समर्थनासाठी सरसावले डॉ.अरविंद कुळमेथे

कामगारांच्या उपोषणाच्या समर्थनासाठी सरसावले डॉ.अरविंद कुळमेथे

कामगारांच्या उपोषणाच्या समर्थनासाठी सरसावले डॉ.अरविंद कुळमेथे

बाभूळगाव येथे बिरसा ब्रिगेडचे तहसीलदार, बीडीओला निवेदन

दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा:- (बाभुळगाव/यवतमाळ):-

मागील पाच दिवसापासून जनवादी कामगार संघटनेचे अध्यक्ष रत्नपाल डोफे यांचे नेतृत्वात बाभूळगाव तहसील कार्यालासमोर कामगारांच्या विविध समस्यांना घेवून आमरण उपोषण सुरु आहे. या उपोषणाला आज २३ सप्टेंबर सोमवारला बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष डॉ.अरविंद कुळमेथे यांनी पाठींबा जाहीर केला. एव्हढेच नव्हे तर कामगारांच्या मागण्यांच्या समर्थनात त्यांनी बाभुळगाव येथील तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयावर कामगारांना सोबत घेवून धडक दिली.

आपल्या आक्रमकतेसाठी प्रसिद्ध असलेल्या डॉ. कुळमेथे यांनी अधिकार्यांना विचारला जाब.

यावेळी कामगारांच्या अर्जावर ग्रामसेवक सह्या करत नसल्यामुळे तात्काळ त्या अर्जांवर सह्या देऊन त्यांचे अर्ज स्वीकारण्यात यावे,  कामगारांना डिनर सेटचे वाटप सुरु करण्यात यावे,  कामगारांना काम करण्यासाठी मिळत असलेल्या कामाची किट पेटी तालुक्याच्या ठिकाणीच देण्यात यावी, लाभार्थी कामगारांना ज्या शासनाच्या योजना आहे त्या तात्काळ देण्यात याव्या, अर्ज भरण्यासाठी जिल्ह्यामध्ये दलालांकडून अव्वाच्या सव्वा रुपये कामगारांकडून वसुली चालू आहे ते दलालांची चौकशी करण्यात यावी व त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. भ्रष्टाचार करत असलेल्या कर्मचारी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, आदी मागण्यासाठी अधिकाऱ्यांची भेट घेतली. मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी बिरसा ब्रिगेडचे डॉ.अरविंद कुळमेथे,किशोर मेश्राम, सचिन मालखेडे ,अल्केश कनाके, कामगार संघटनेचे वंदना शेळके, सम्येक म्हैस्कर, संजय शेळके, सुजाता डोफे यांचे सह कामगार महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

spot_img