बाभूळगाव शाळासमितीच्या अध्यक्षपदी अंकुश सोयाम, उपाध्यक्ष लता सौसाकडे
दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा : (बाभुळगाव/यवतमाळ):-
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा बाभूळगावची शाळा व्यवस्थापन समीती गठीत करण्यासाठी २० सप्टेंबर रोजी पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये विविध प्रवर्गा मधुन बारा सदस्यांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर २३ सप्टेंबर रोजी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड करण्या करीता विशेष सभा बोलावण्यात आली. या सभेत नवनिर्वाचित सर्व बारा सदस्य उपस्थित होते. सर्वप्रथम अध्यक्षपदाची निवडणुक घेण्यात आली, त्यासाठी अंकुश सोयाम व कांता रवि सहारे यांनी अर्ज सादर केले. यामध्ये अंकुश सोयाम यांना सात मते तर कांता सहारे यांना पाच मते मिळाल्याने अंकुश सोयाम हे अध्यक्ष म्हणून निवडून आल्याचे घोषित करण्यात आले. उपाध्यक्ष पदासाठी लता गजानन सौसाकडे,हिना सलीम शेख, तृप्ती हिंमत गुंडारे यांनी उमेदवारी दाखल केली. यात लता सौसाकडे यांना पाच मते , तृप्ती गुंडारे यांना चार तर हिना शेख यांना तिन मते मिळाली. त्यानुसार लता गजानन सौसाकडे या उपाध्यक्षपदी निवडुण आल्या.
या निवड प्रक्रियेमध्ये व्यवस्थापन समितीच्या सर्व बाराही सदस्यांनी सहभाग घेतला. नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता फुलकर, शिक्षक प्रशांत भुराणे यांनी पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी अध्यक्ष अंकुश सोयाम यांनी आपल्या निवडीचे श्रेय समीतीतील सर्व सदस्यासह खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष श्रीकांत कापसे, नगर पंचायत उपाध्यक्ष शाम जगताप, नगर सेवक शेख कादर, अक्षय राऊत, प्रदिप नांदुरकर, नरेश सातपुते, नन्ना महाजन, भरत भुराणे, प्रेमचंद छल्लानी, प्रफुल तातेड, अजमत मुल्ला आदींना दिले. यावेळी निखील तातेड, तृप्ती गुंडारे,कांता रवि सहारे,हिना शेख सलीम,अमिन भाई,सचिन माटोडे,वर्षा सचिन माटोडे, शशिकांत थोटे प्रविण चेंडकापुरे, छोटी चिव्हाणे उपस्थित होते.