शासनाच्या विविध अन्यायकारक शैक्षणिक धोरणाचा व कंत्राटीकरणाचा केला निषेध.
शिक्षक संघटनांच्या समन्वय महासंघाचा लक्षवेधी आक्रोश मोर्चा.
जिल्ह्यातील तिन हजारापेक्षा अधिक शिक्षकांनी आक्रोश महामोर्चात नोंदवला सहभाग
दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा : यवतमाळ
जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांनी एकत्र येत जि.प.शिक्षक संघटना समन्वय महासंघाच्या वतीने दि.25 सप्टेबरला शासनाच्या विविध अन्यायकारक व कंत्राटीकरण धोरणाच्या निषेधार्थ जिल्ह्यातील तमाम शिक्षकांनी सामुहिक रजा घेवून आक्रोश महामोर्चाचे आयोजन जि.प.प्रशासकीय इमारती समोर करण्यात आले. यामध्ये जिल्ह्यातील 16 ही तालुक्यातील3000 पेक्षा अधिक शिक्षकांनी सहभाग नोंदविला. नव्याने 15 मार्च 2024 चा संच मान्यता निर्णय व 20 पटसंख्येपेक्षा कमी असलेल्या शाळेतील एक शिक्षक कंत्राटी पद्धतीने नियुक्त करणे व अशा कंत्राटीकरणाच्या विरोधात व सरसकट विषय शिक्षकांना वेतनश्रेणी देण्यात यावी राज्यातील अनेक स्वराज्य संस्थांच्या शाळा, विद्यार्थी, शिक्षक प्रलंबीत विविध मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. कंत्राटी शिक्षक भरतीचा निर्णय रद्द करावा, विद्यार्थी आधारकार्ड आधारीत शिक्षक पद निर्धारण धोरण रद्द करावे, संचमान्यता व 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमधील कंत्राटी शिक्षक नियुक्त करणे हे दोन्ही निर्णय विद्यार्थी व शिक्षक हिताचे नसून भविष्यात ग्रामीण भागातील गोर गरीबांच्या मुलांना शाळेपासून व शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा धोका संभावतो व 7 व्या वेतन आयोगातील पदविधर शिक्षकांच्या व सन 2004 नंतर सेवेत लागलेल्या शिक्षकांना वेतनश्रेणी देण्यात यावी, सन 2005 नंतर सेवेत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना पेंशन आदेश निर्गमित करावे, विद्यार्थ्यांना मोफत गणवेश अविलंब मिळावे, पुरेशे पाठ्यपुस्तक देण्यात यावे, अशैक्षणिक कामे रद्द करावी, सर्व विषय शिक्षकांना सरसकट वेतनश्रेणी लागू करण्यात यावी, शालेय पोषण आहार योजना स्वतंत्र यंत्रणेकडे सोपवावी अशा विविध मागण्यांचा समावेश आहे. यासाठी शिक्षक संघटना समन्वय महासंघातर्फे या आक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले. हा आक्रोश महामोर्चा जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीपासून विविध घोषणा देत मार्गक्रमण करीत संविधान चौक, शहर पोलीस स्टेशन, पाचकंदील चौक, एलआयसी चौक, जिल्हाधिकारी कार्यालय येथे विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी मार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.
याप्रसंगी जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विचार व्यक्त केले. यामध्ये किरण मानकर, आसाराम चव्हाण, मधुकर काठोळे, नाना नाकाडे, सुनिता गुघाणे, शैलेश राऊत, किरण राठोड, महेंद्र विरुळकर, सचिन सानप, डॉ.सतपाल सोहळे, कुलदिप डंभारे, नंदकिशोर वानखडे, शशीकांत लोळगे, अरविंद देशमुख, आनंद शेंडे, मोहम्मद रफिक, पुंडलीक रेकलवार, डॉ.संदिप तंबाखे, पुरुषोत्तम ठोकळ आदिंनी विचार व्यक्त केले व शासनाच्या विविध अन्यायकारक धोरणांचा निषेध व्यक्त केला व असे अन्यायकारक शासन निर्णय रद्द करावेत असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन तंबाखे यांनी केले तर उपस्थितांचे आभार राजहंस मेंढे यांनी मानले.
या आक्रोश मोर्चाच्या यशस्वीतेसाठी गजानन देऊळकर, स्वप्नील फुलमाळी, विलास राठोड, विनोद खरुलकर, मिलींद देशपांडे, संतोष मरगडे, सारंग भटुरकर, राधेशाम चेले, राजेश उदार, नदिम पटेल, रवी राठोड, पुंडलीक बुटले, सचिन ठाकरे, विशाल साबापुरे आदि शिक्षकांचा सहभाग होता. यावेळी जिल्ह्यातील विविध संघटनांचे पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. तसेच या महाआक्रोश मोर्चाची सांगता वंदे मातरम् गीताने करण्यात आली. असे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राजहंस मेंढे यांनी कळविले आहे….