डॉजबॉल स्पर्धेत विश्वभारती विदयामंदिर स्कुलला मिळाले मुला व मुलींचे अजिक्य पद.
दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा : यवतमाळ
क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ व जिल्हा क्रीडा परीषद, यवतमाळ यांचे व्दारे जिल्हास्तरीय शालेय डॉजबॉल क्रीडा स्पर्धा सन २०२४-२५ वयोगट १७ व १९ वर्ष आतील स्पर्धेत विश्वभारती विदया मंदीर इंग्लीश मिडीयम स्कुल मधील १९ वर्ष आतील वयोगटात मुला व मुलींचा संघ विजयी झाला.
या स्पर्धेत विश्वभारती शाळेतील विदयार्थी जय तायडे, वेदांत धवणे, श्रेयस खंडागळे, कृष्णा चौधरी, शंशांत डोंगरे, हार्दिक पवार, श्रेयश डोंगरे, प्रदयुम्न जाधव, सौरभ खंडारे व वंश बावनकर यांचा विजयी संघात समावेश होता. मुलींचा १९ वर्षे वयोगटातील हेरण जिवणे, श्रध्दा खाचणे, कृष्णाई नेमाडे, जागृती खरात, स्नेहल निस्ताने, जया कांबळे, अनुष्का राठोड, प्राची डाकुलकर, हर्षदा ठाकरे, लक्ष्मी गार्शलवार व शिवाणी राऊत विजयी संघात समावेश होता.
या स्पर्धेकरीता शाळेचे अध्यक्ष ज्वालासींग ठाकुर, सचीव हिरासींग चव्हाण व मुख्याध्यापिका दिप्ती देशमुख यांनी कौतुक केले. तसेच विश्वभारती शाळेचे शाररीक शिक्षक अमोल जयसींगपुरे यांचे मार्गदर्शन लाभले.