धम्मभूमी कोटंबा येथे उत्तर प्रदेश व दिल्लीच्या महिला उपसकांनी घेतली श्रामनेर दीक्षा…..
दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा: बाभुळगाव/ कोटंबा
बुद्ध संदेश शिक्षण प्रचार सभा तथा साप्ताहिक शेतकरी सत्ता, धम्मभूमी मासिक पत्रिका कोटंबा यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि. २५सप्टेंबर २०२४ ला उत्तर प्रदेश, आजमगड व जौनपूर, दिल्ली येथून आलेल्या दोन महिला उपासिकांनी ‘धम्मभूमी महाविहार कोटंबा‘ येथे श्रामनेर दीक्षा घेऊन काशायवस्त्र परिधान केले. पूज्य भन्ते धम्मवीर रा. भिवापूर जि.अमरावती तसेच पुज्य आर्या प्रजापती थेरी, कोटंबा तसेच धम्मभूमीचे व्यवस्थापक आदरणीय विजय डांगे साहेब यांच्या मंगल उपस्थितीत श्रामणेर दीक्षा समारंभ संपन्न झाला
या मंगलप्रसंगी पूज्य भन्ते धम्मवीर व पूज्य आर्या प्रजापती थेरी यांनी त्यांच्या सुमधुर वाणीतून बुद्ध वंदना, परित्राण पाठ व धम्मदेशना देऊन दोन महिला उपासीकांना श्रामनेर दीक्षा दिली, तसेच श्रामनेर धम्मदीक्षेचे महत्व सांगितल या मंगल प्रसंगी धम्मभूमी बुद्ध महाविहार कोटंबाचे व्यवस्थापक मा.आयु.विजय डांगे साहेब, भिवापूर जि. अमरावती येथील उपासक व उपासिका तसेच शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.