पांडे विद्यालयात कार विरहित दिन साजरा
दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा : बाभुळगाव/यवतमाळ
स्व.माणिकराव पांडे (पाटील) विद्यालय,फाळेगाव या शाळेत जागतिक कार विरहित दिन फाळेगाव स्टॅन्ड येथे सायकल रॅली कादून साजरा करण्यात आला. राष्ट्रीय हरित सेना इको क्लब विद्यार्थ्यातर्फे सायकर रॅली द्वारे कोल्ही, बारड, फाळेगाव स्टॅन्ड येथेफेरी काढून फलके घेऊन सायकल चालवा इंधन वाचवा,पर्यावरण रक्षक आरोग्य रक्षक, पर्यावरण वृद्धी मानव समृद्धी, अशा प्रकारे जनजागृती केली प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वांनी हातभार लावावे लावणे गरजेचे आहे हा संदेश सर्व दूर जावा यासाठी जगभर दिनांक 22 सप्टेंबर हा दिवस जागतिक कारवीर ही दिवस म्हणून साजरा करण्यात येतो अशी शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री काळे यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांना संबोधित केले सायकल रॅलीमध्ये राजेंद्र राऊत, माधव घोडे, विजय भोयर, अरुण ठाकरे, गजानन वाघाडे, सोनाली वाढाई, अनंत अलोने, पुरुषोत्तम सहारे,श्री राजेंद्र धांदे, तुकाराम सयाम तसेच राष्ट्रीय हरित सेना इको क्लबचे विद्यार्थी सहभागी झाले होते.