हिंगुलांबिका माता मंदिरात नवरात्र उत्सवाचे आयोजन
दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा: यवतमाळ :-
वाघापूर – लोहारा बायपास येथील साठवणे ले-आऊट मधील माता हिंगुलांबिका मंदिरात रविवार दि. २२ सप्टेंबर रोजी यवतमाळ भावसार समाजाची सभा संपन्न झाली. सभेचा मुख्य उद्देश “नवरात्र-२०२४” चे आयोजन करणे हा होता. या सभेमध्ये कार्यक्रमांची रुपरेषा, कार्यक्रमांचे प्रकल्प अधिकारी नेमणे, महाप्रसाद भोजनाचे सामुग्री दाते निश्चित करणे या विषयांवर साधक बाधक चर्चा करण्यात आली. या व्यतिरिक्त मंदिराचे विस्तारित बांधकाम, आर्थिक आढावा ह्या विषयावर सभेत चर्चा झाली. यवतमाळ भावसार समाजाचे अध्यक्ष वसंतराव सरागे यांनी सभेस सुरवात करतांना सभेचा उद्देश सांगितला. गुरुवार, दि. ३ ऑक्टोबर पासून हिंगुलांबिका माता मंदिरात नवरात्र उत्सव सुरू होणार असल्याचे जाहीर केले. घटस्थापना दिनापासून दस-यापर्यंत प्रत्येक तिथीला मातेला कोणाकडून साडी नेसवल्या जाणार, रोज सायंकाळी सात वाजता देवीची आरती झाल्यानंतर त्याच दिवशी दुसऱ्या दिवसाचे नियोजन ठरवीले जाणार असल्याचे सांगितले. संस्कृती” भावसार महिलाा उद्योगच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त रोख रक्कम देणगी स्वरूपात अध्यक्षांना देण्यात आली. यावेळी भावसार बंधू, भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.