Homeयवतमाळहोंडा शायीन- क्रेटाचा भीषण अपघात, दुचाकीस्वार ठार

होंडा शायीन- क्रेटाचा भीषण अपघात, दुचाकीस्वार ठार

होंडा शायीन- क्रेटाचा भीषण अपघात, दुचाकीस्वार ठार

बाभूळगाव तालुक्यातील वेणी (कोठा) जवळील घटना

दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा : बाभूळगाव:

होंडा कंपनीची शाईन दुचाकी व हुंदाई क्रेटा कारची समोरासमोर धडक होवून त्यात दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना दि. २८ रोजी सकाळी ९.३० वाजताचे सुमारास बाभूळगाव-कळंब रोडवरील वेणी(कोठा) गावाजवळ घडली. मृत पावलेल्या दुचाकीस्वाराचे नाव सागर भिमराव केसकर, वय २१ वर्षे, रा. गोंधळी असे आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहिती नुसार सागर केसकर हा त्याचे गांेंधळी या राहते गावाहून सकाळी दुचाकी क्र. एम.एच.२९बी.एस.९२९७ या वाहनाने आई,वडील व मजुरांना देण्यासाठी जेवणाचे डबे घेवून वेणी शिवारात असलेल्या बेड्यावर जाण्याकरिता निघाला होता. दरम्यान नायगाव ते वेणी गावाच्या मधात  दुचाकीच्या हँडलला लटकलेल्या जेवणाच्या डब्यांमुळे हँडल फिरविण्यास अडथळा निर्माण झाल्याने त्याची भरधाव दुचाकी रोडच्या दुसÚया बाजूला जात असताना समोरून येणाÚया क्रेटा क्र. एम.एच.३४बी.एफ.५७६० या चारचाकी वाहनाला त्याची जबर धडक बसली. यात सागर केसकर हा चारचाकी वाहनावर आदळल्याने गंभीर जखमी झाला. त्याला गावकÚयांनी ताबडतोब प्राथमिक उपचारासाठी बाभूळगाव ग्रामीण रूग्णालयात आणले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला यवतमाळ येथे रेफर करण्यात आले, मात्र वाटेतच त्याचा मृत्यु झाला. सदर घटनेची फिर्याद शंकर लायणु केसकर, रा. गोंधळी यांनी बाभूळगाव पोलिसांत नोंदवली. पुढील तपास पोलीस निरीक्षक एल.डी. तावरे यांचे मार्गदर्शनात जमादार आशिष अवजाडे, पो.का. सागर बेलसरे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

spot_img