Homeक्राईमसिटीलँड, बिझीलँड मध्ये बालकामगारांचे शोषण ?

सिटीलँड, बिझीलँड मध्ये बालकामगारांचे शोषण ?

सिटीलँड, बिझीलँड मध्ये बालकामगारांचे शोषण ?

भीम ब्रिगेडने केला पर्दाफाश….व्यापार्यांवर कार्यवाहीची मागणी

दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा : अमरावती :

विदर्भातील सर्वात मोठे कापड मार्केट म्हणून नावलौकिक मिळविलेले अमरावती येथील नांदगाव पेठ सिटीलँड आणि बिझीलँड मध्ये अनेक व्यावसायिकांकडे  बालकामगारांचा भरणा असल्याचे आढळून आले आहे.  त्यांच्या गरीब परिस्थितीचा फायदा घेत अत्यल्प वेतनावर अनेक दुकानांमध्ये बालकामगारांना कामावर ठेवल्याचे समोर आले आहे. शनिवारी सायंकाळी कामगार अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भीम ब्रिगेडने दहा ते बारा बालकामगारांची  मुक्तता केली. या प्रकारामुळे बाल न्याय हक्क संदर्भातील शासनाच्या नियमावलीला दुकानमालकांनी तिलांजली दिल्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाहीची मागणी भीम ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रवीण मोहोड यांनी केली आहे.

बिझिलँड आणि सिटीलँड मधील अनेक दुकानांमध्ये कायद्याचे उल्लंघन करत मालकांनी अत्यल्प वेतनावर बालकामगार कामावर ठेवल्याची माहिती भीम ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रवीण मोहोड यांना मिळाली होती. प्रवीण मोहोड यांनी याबाबत कामगार आयुक्त व जिल्हा कामगार अधिकारी यांना लेखी तक्रार देऊन कार्यवाहीची मागणी केली होती.तरीसुद्धा कामगार आयुक्त व अधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकरणाची दखल न घेतल्याने शनिवारी प्रवीण मोहोड, राजेश वानखडे व भीम ब्रिगेड च्या कार्यकर्त्यांनी अचानक सिटीलँड मधील समता क्रिएशन, माहेरा क्रिएशन, वानी , मन्नत , रोनक, डि.के कपडा प्रतिष्ठान याठिकाणी धाडी मारून काम करणाऱ्या  बालकामगारांना बाहेर काढले व त्यांची मुक्तता केली. कामगार अधिकाऱ्यांनी यावेळी सर्वांचे आधार कार्ड तपासले असता सर्व मुले ही ११ ते १५ वयोगटातील असल्याचे सिद्ध झाले.घरची परिस्थिती हलाकीची असल्याने ही मुले कामाच्या शोधत दुकानात येतात मात्र त्यांच्या परिस्थितीचा फायदा घेत अत्यल्प वेतनावर त्यांना कामावर ठेवण्यात येते व त्यांच्याकडून कठीण कामे करण्यात येते असा प्रकार याठिकाणी सुरू असल्याचे आढळून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

spot_img