मेळघाट मध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले
दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा | अमरावती :
आज दि. ३० सप्टेंबर रोजी दुपारी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी, मेळघाट मध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. मेळघाट मधील चिखलदरा, शहरातसह तालुक्यातील काटकुंभ, चूर्णी,पाचडोंगरी जरीदा यासह तालुक्यातील अनेक गावात भूकंपाचे सौम्य झटके नागरिकांनी अनुभवले. यासोबतच परतवाडा, अचलपूर शहरात देखील काही ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी परिस्थितीची माहिती घेतली. भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हा प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.