Homeक्राईमगांजासह २५ लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी पकडला

गांजासह २५ लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी पकडला

गांजासह २५ लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी पकडला

यवतमाळ गुन्हेशाखेची बाभूळगावात कारवाई

दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा | बाभुळगाव :-

कळंब वरून ग्रे रंगाची हुंडई चारचाकी क्र. सी.जी.१२ ए.व्ही ०५१५  ही गाडी बाभुळगावकडे येत असताना यवतमाळ येथील गुन्हे शाखेच्या पथकाने बाभूळगाव ते कळंब रोडवर असलेल्या  तहसील कार्यालय समोर  थांबून गाडीची  झडती  घेतली. त्यात १२ लाख ३० हजार रुपयांचा गांजा हा अमली पदार्थ आढळून आला. सदर कारवाही दि. १ ऑक्टोंबरच्या मध्यरात्री नंतर करण्यात आली. शाहदत खान उस्मान खान वय ६० रा. रायगड , छत्तीसगड, सोहेल खान शहादत खान, वय २० रा. रायगड, फरिदा खान शाहदत खान वय ६० रायगड,  यांना पोलिसांनी अटक केली.  या आरोपीने गोपाल रा. झरसुगुता. ओरिसा, सलीम रा. नेरपांसोपंत ,यवतमाळ यांची  नावे पोलिसांना सांगितली आहेत. पोलीस या दोन आरोपीच्या शोधात आहे.  आरोपी जवळून १३ लाख रुपयाची हुंडई क्रेटा,१२ लाख ३० हजार रुपयाचा गांजा व १८ हजार रुपयाचे तीन मोबाईल असा एकूण  25 लाख  ४८ हजाराचा  मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर  घटनेची लेखी तक्रार गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुगत नाथराव पुंडगे यांनी बाभुळगाव पोलीस स्टेशनला दिली. अधिक तपास बाभूळगाव पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

spot_img