Homeमहाराष्ट्रबाभुळगावबेंबळा नदीतून होणा-या रेती वाहतुकीमुळे सावंगी (मांग)वासी त्रस्त

बेंबळा नदीतून होणा-या रेती वाहतुकीमुळे सावंगी (मांग)वासी त्रस्त

बेंबळा नदीतून होणा-या रेती वाहतुकीमुळे सावंगी (मांग)वासी त्रस्त

– जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन

दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा| बाभूळगाव :- 

 बाभूळगाव तालुक्यातील सावंगी (मांग), मुरादाबाद ही गावे  बेंबळा नदीच्या काठावर आहेत. या गावात गेल्या अनेक वर्षापासून अवैधपणे रेतीची मोठया प्रमाणावर तस्करी होत आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी अनेकदा बाभुळगांव तहसील व पोलीस स्टेशन येथे तक्रारी दिल्या. परंतू त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. आज रोजी बेंबळा नदीतून रात्र व दिवसा अनेक ट्रॅक्टर व ट्रक व्दारे रेतीचा बेकायदेशीरपणे उपसा करून तस्करी होत आहे. यामुळे गावाचा एकमेव रस्ता खराब झाला आहे. रस्त्यासाठी गेल्या दहा ते बारा वर्षापासून हाल अपेष्ठा भोगल्या होत्या. आता दोन महिणेअगोदर १ की.मी. पर्यंत काम झाले. पण बेंबळा नदीतून बेकायदेशीरपणे रेतीचे ट्रॅक्टर व ट्रॅक जात असल्यामुळे नुकत्याच झालेल्या रस्त्याला खड्डे पडत आहे. त्यामुळे सावंगी (मांग)वासी त्रस्त झाले आहेत. याबाबतचे निवेदन सरपंच, उपसरपंच, गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना ३० सप्टेंबर रोजी दिले. 

तालुक्यात होत असलेल्या रेती तस्करीला महसूल विभागातील काही कर्मचार्यांसह पोलीस विभागातील एक दुय्यम दर्जाचे अधिकारी व त्यांचा एक साथीदार या अवैध रेती वाहतुकीस पाठींबा देत असल्याचे दिसून आले आहे. दुय्यम पोलीस अधिकारी व त्यांचा साथीदार हे खुलेआम हप्ते घेवून रेती तस्करांना पाठीशी घालत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. नदीलगत असलेल्या शेतीचे प्रचंड नुकसान होवून शेतात जाण्याकरिता मार्ग राहिला नाही. तसेच गावक-यांनी तस्करी थांबविण्यासाठी प्रयत्न केल्यास रेती तस्कर जिवे मारण्याची धमकी देतात. गावकऱ्यांनी  तहसिलदार यांना याबाबत वारंवार अवगत केलेले आहे. त्यांनी यावर अंकुश लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला परंतू या भ्रष्ट अधिकारी व इतर संबंधीत कर्मचा-यांमुळे त्यांचा नाईलाज झाला. पोलीस विभागातील त्या दुय्यम अधिकाऱ्याच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी गावकर्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांचेकडे केली आहे. निवेदन देतेवेळी सरपंच सारंगधर घ. दातारकर, प्रविण चेंडकापुरे (उपसरपंच), मंगेश हस्तापुरे, अमोल दांडगे, प्रकाश दांडगे, ऋषभ चौधरी, राजेश धांदे, राजू कोडापे यांचेसह गावकरी उपस्थित होते. या प्रकाराकडे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी लक्ष देणे गरजेचे झाले आहे.

— ‘तो’ दुय्यम अधिकारी आल्या पासूनच आहे चर्चेत…

बाभूळगाव पोलीस स्टेशनला रुजू झाल्यापासून एक दुय्यम अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या अविर्भावात वावरत असल्याचे दिसून आले आहे. आल्या आल्याच त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये गटबाजी सुरु केल्याची चर्चा दबक्या आवाजात ऐकू येत आहे. कुठल्याही प्रकरणात ‘सेटिंग’ महत्त्वाची मानणारा हा अधिकारी लक्ष्मी दर्शनासाठी पुढेच असतो व त्यासाठी त्याचा एक साथीदार नेहमीच तय्यार असल्याचा अनुभव तालुक्यातील अनेकांना आला आहे. नुकतेच घारफळ येथील एका जुगार प्रकरणात या दुय्यम अधिकाऱ्याचे नाव चर्चेत आले. ठाणेदाराच्या गैरहजेरीचा या दुय्यम अधिकाऱ्याने चांगलाच फायदा करून घेतल्याची चर्चा संपूर्ण तालुक्यात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

spot_img