राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त रक्तदान जनजागृती व रक्तचाचणी शिबीर
मातोश्री नानीबाई घारफळकर विज्ञान महाविद्यालयात आयोजन
दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा | बाभूळगाव:-
मातोश्री नानीबाई घारफळकर विज्ञान महाविद्यालय बाभूळगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना दिन हा रक्तदान जनजागृती व रक्त चाचणी शिबीर आयोजित करून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.प्रमोद मुलकलवार हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून ग्रामीण रूग्णालय बाभूळगाव येथील पॅथाॅलाॅजी विभागाच्या डाॅ. ऋतुजा देशमुख, ज्योती बावणे, महाविद्यालयाचे गं्रथपाल उमेश खडसे, शारिरीक शिक्षण क्रीडा विभागाचे संचालक व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डाॅ. सुशील बत्तलवार विचारपीठावर उपस्थित होते.
रक्तदान ही काळाची गरज आहे. रक्तदान केल्याने कोणतेही नुकसान होत नसुन त्याचा फायदा हा रक्त देणा-यास व रक्त घेणा-यास होतो. रक्तदान कोण व कधी करू शकतो या संबंधी व रक्त चाचणी आपण का करावी, या संबंधी ऋतुजा देशमुख यांनी सविस्तर माहिती दिली.
महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय सेवेची व ग्रामस्वच्छतेेची मुहूर्तमेढ संत गाडगे बाबा यांनी रोवली आहे. त्यांच्या विचारातून समाजामध्ये विज्ञाननीष्ठ दृष्टीकोन रूजविल्या गेला.समाजात जीवन जगत असताना मानसाचे मन हे निर्मळ असले पाहिजे. त्यासाठी अंतर्गत स्वच्छता व बाह्य स्वच्छता महत्त्वाची आहे. त्यामुळे संत गाडगे बाांनी दिवसा ग्राम स्वच्छ करून गावागावातील घाण साफ केली व रात्री कीर्तनातून समाज प्रबोधनाद्वारे आंतरीक स्वच्छता केली. असे प्राचार्य डाॅ. पी.एम. मुलकलवार यांनी प्रतिपादन केले. राष्ट्रीय सेवा योजना ही भारत सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना असून ही, भारत सरकारच्या मानवविकास मंत्रालयाद्वारे चालविल्या जाते. महाविद्यालयीन विद्यार्यांना राष्ट्रीयत्वाची व समाजसेवेची भावना निर्माण करणे हे राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्दिष्ट आहे. असे प्रास्ताविकातून डाॅ. सुशील बत्तलवार यांनी माहिती दिली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बि.एस.सी. भाग 1 ची विद्यार्थीनी धनश्री हेलोंडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन वैदेही रूपतवार हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डाॅ. रमा बाजोरिया, वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रूग्णालय बाभूळगाव, डाॅ. लीना मुसळे, वैद्यकीय अधिकारी, उदय पिंपळे व हिंदलॅबचे कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक डाॅ. स्मिता पाटील, डाॅ. भावना पिल्लई, प्रा. अंकीत चव्हाण, प्रा. रूपेश आडे, प्रा. कांचन कठाळे, प्रा. मीनल वानखडे, प्रियंका नैताम, प्रा. आरती अष्टेकर, शिक्षकेतर कर्मचारी सुशांत बिरे, प्रशांत गायकवाड, संजय ठवळे, विवेक ठवळे, मनीष कडू, संदीप कुडे, सचिन मानकर, सागर गोळे, आकाश वातकर, चंद्रशेखर लांडगे, गजानन गावंडे, आशिष वानरे, व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.