Homeशासकीय योजना  केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने लाँच केले APAAR ID  कार्ड

  केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने लाँच केले APAAR ID  कार्ड

  केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने लाँच केले APAAR ID  कार्ड

दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा | बाभूळगाव :-

 ▪️APAAR आयडी म्हणजे ऑटोमेटेड पर्मानेंट एकेडमिक अकाउंट रजिस्ट्री म्हणजेच

   ‘स्वयंचलित स्थायी शैक्षणिक खाते नोंदणी’ होय.

 ▪️हे वन नेशन वन स्टुडंट आयडी कार्ड म्हणून ओळखले जाईल.

▪️यामध्ये विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती उपलब्ध असेल.

 ▪️हे कार्ड शाळा बदलण्यासाठी, योजना, शिष्यवृत्ती इत्यादीसाठी उपयोगी असेल.

केंद्र सरकारने गेल्या 10-12 वर्षांत आधार कार्ड तयार करण्यासाठी मोठी कवायत केली. देशातील अनेक जणांनी आधार कार्ड तयार केले. आधुनिक काळासाठी हा दस्तावेज महत्वाचा आहे. आधार कार्डमुळे अनेक सरकारी कामे, खाते उघडण्याचे काम सोपे झाले आहे. आता विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारने अपार कार्ड तयार करण्याची कवायत करण्यात येणार आहे. अपार कार्ड केवळ मुलांसाठी आहे. त्याचा त्याला मोठा फायदा होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हे कार्ड महत्वाचे ठरणार आहे. अपार कार्ड हे एक राष्ट्र , एक विद्यार्थी या संकल्पनेवर आधारीत ओळखपत्र आहे. कुठे होणार त्याचा वापर, काय होईल फायदा, हे जाणून घेऊयात..

आधारसारखेच पॉवरफुल अपार कार्ड

घरातील शाळेत जाणाऱ्या मुला-मुलींसाठी अपार कार्ड महत्वाचे आहे. भविष्यात हा एक अत्यंत आवश्यक दस्तावेज ठरणार आहे. यामध्ये विद्यार्थ्याच्या शैक्षणिक नोंदी असतील. त्याची क्रीडा क्षेत्रातील निपुणता यामध्ये नोंदवला जाईल. लवकरच विविध शाळांमध्ये अपार कार्ड नोंदणीला सुरुवात होत आहे. या कार्डमध्ये विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीविषयीची पण माहिती नोंदवण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

spot_img