अमोलकचंदच्या विद्यार्थ्यांचे रातचांदणा येथे स्वच्छता व जनजागृती अभियान.
दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा : यवतमाळ
महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत यवतमाळ येथील अमोलोकचंद महाविद्यालयतील विद्यार्थ्यांनी रातचांदना या गावात दिनांक २ ऑक्टोंबर रोजी मिरवणूक काढून स्वच्छता अभियान राबविले.यात पथनाट्यातून नागरिकांना स्वच्छतेचे महत्व व कचऱ्याचे व्यवस्थापन कसे करावे याची माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी घोषवाक्ये, कविता, आणि भजनातून उपस्थित नागरिकांचे प्रबोधन केले.तसेच महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त प्रतिमेला माल्यार्पण करून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राममनोहर मिश्रा सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी सरपंच सौ.सविता भेंडारकर, उपसरपंच दामोदर बेंडे, ग्रामसेविका चंदा गाडेकर, पोलीस पाटील नारायण बेंडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रल्हाद चुटे व रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी,सह-कार्यक्रम अधिकारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.