गांधी जयंतीला शालेय साहित्य वाटून विक्रमने केला जन्मदिवस साजरा.
दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा : बाभुळगाव
गिमोणा येथे ग्रामपंचायत सदस्य विक्रम रामटेके यांच्या वाढदिवसाचे आणि महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून दिनांक २ ऑक्टोंबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा गिमोना येथील विद्यार्थ्यांना वही व पेन या शालेय साहित्याचा वाटप करून आपला वाढदिवस व महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली. तसेच जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात पिंपळाचे वृक्ष लावण्यात आले. विक्रम रामटेके यांनी मार्गदर्शन करतांना म्हटले की, विद्यार्थ्यांचा भक्कम पाया रचणारे आपले आदर्श हे आपले शिक्षकच आहेत. तेच खरा शिक्षणाचा पाया मजबूत करतात. त्यासाठी मुलांमध्ये सुद्धा शिक्षणाची आवड निर्माण व्हायला पाहिजे. याव्यतिरिक्त आजचे हे विद्यार्थी उद्याचे भविष्य आहे,उद्याचा युवा आहे त्यासाठी येथून विद्यार्थी घडून चांगल्या स्तरावर जावे असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी ग्रामपंचायतच्या सरपंच मोहिनी वाघ, सदस्य प्रशांत येंडे, ज्योती चौके, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक संदीप वाढई, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल लाकडे, आशा सेविका घावडे, उईके ताई आणि गावातील नागरिक पंजाब कांबळे, अरविंद क्षिरसागर, विनोद कांबळे, संदीप कांबळे, खुशाल क्षिरसागर, महेश मानकर आदी उपस्थित होते.