Homeखेळ आणि मनोरंजनराज्यस्तरीय सिलंबम स्पर्धेत यवतमाळ ने मारली बाजी

राज्यस्तरीय सिलंबम स्पर्धेत यवतमाळ ने मारली बाजी

आजच्या ताज्या बातम्या

राज्यस्तरीय सिलंबम स्पर्धेत यवतमाळ ने मारली बाजी
31 स्पर्धकांनी प्रत्येकी दोन इव्हेंट मध्ये 62 मेडल पटकावत राखले प्रथम स्थान

दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा :यवतमाळ.

सिलंबम स्पोर्ट्स असो. ऑफ महाराष्ट्र आणि चंद्रपूर जिल्हा मॅच्युअर असो. द्वारा विदर्भातील क्रीडा क्षेत्राच्या इतिहासात प्रथमच खेलो इंडिया खेळ सिलंबम (लाठीकाठी) या खेळाच्या भव्य राज्यस्तरीय सिलंबम चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन भद्रावती येथील आशीर्वाद सभागृहात 28 आणि 29 सप्टेंबरला करण्यात आले होते. या स्पर्धेत यवतमाळ, वर्धा, अमरावती, नागपूर, गोंदिया, भंडारा, पुणे, चंद्रपूर वाशिम, अकोला, सातारा आणि वाशिम या जिल्ह्यातील जवळपास 200 स्पर्धकांनी वेगवेगळ्या इव्हेंटमधे भाग घेतला होता. त्यात सर्वाधिक मेडल जिंकत यवतमाळ जिल्ह्याचे प्रथम क्रमांक आले, द्वितीय क्रमांक चंद्रपूर आणि तिसरा स्थानावर नागपूर राहिले, स्पर्धेत मुख्य पंच म्हणून महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष संजय बनसोडे( आंतरराष्ट्रिय पंच ), स्मिता धिवार ( आंतरराष्ट्रिय पंच), विदर्भ प्रमुख दुर्गराज रामटेके, अमरावती विभाग प्रमुख प्रितम सोनवणे व अन्य जिल्हयाचे प्रतिनिधी नी आयोजकाची व पंचाची भूमिका पार पाडली. तसेच यवतमाळ चे प्रशिक्षक प्रीतम सोनवणे यांची सिलांबम स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र च्या अमरावती विभाग प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. यावेळेस तिलक डोमडे, दिनेश रोकडे, मयुरेश शर्मा, मयूर वानखडे, प्रवीण लांजेकर, ललित जैन, सुरेंद्र राऊत, मयूर पिसे, अनिकेत पोहेकार यांचे मार्गदर्शन लाभले.
जिल्ह्यातील ह्या 31 विद्यार्थ्यांनी पटकावले पदक

फायटिंग आणि रोलिंग इव्हेंट मध्ये विवेक खराटे, वाहुल दोंदल ,वैभव मून, स्वर्णेश रोकडे, सुकन्या पोहोकार, सत्यम पाटणकर, वंशिका नवरंग, सिद्धी मेहता, मीत धुके, जय घ्यारे, जागृती लांजेकर, आरुषी जयस्वाल, अर्चीत जैसवाल .समृद्धी सुभेदार, रिया मोरवाल, गौरी मोरवाल , शौर्य कैथवस, वीरू केथवास, ओम गुल्हाने, ऋषिकेश रोम, कश्यपी दोनदल, ईश्वरी गोडबोले, रुद्रा हेमने, पूर्वजा हेमने ,कार्तिक घ्यारे, विशाल पिसे,सोहम बत्तलवार, वंश फुटाणे ,विनय चव्हाण, मंथन वर्मा , यश कात्रे यांनी पदक प्राप्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

spot_img