Homeआरोग्य"जागतिक हृदय दिन"

“जागतिक हृदय दिन”

ग्रामीण रुग्णालय बाभुळगाव येथे “जागतिक हृदय दिन”

दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा | बाभूळगाव :-

हृदयाशी संबंधीत आजारांमुळे वाढणारा मृत्यूदर कमी करून लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी २९ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक हृदय दिन” म्हणून जगभरात साजरा केला जातो. त्याकरीता जनतेमध्ये व्यापक जनजागृती करून हृदयाशी संबंधीत विकार व प्रतिबंधात्मक उपायाचे महत्व सांगितले जाते. त्या अनुषंगाने ग्रामीण रुग्णालय बाभुळगाव येथे दि. १ ऑक्टोबर २०२४ रोजी “जागतिक हृदय दिन ” साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष वैद्यकिय अधिक्षिका डॉ रमा बाजोरिया यांनी हृदय विकार हे जगामध्ये मृत्यूचे प्रमुख कारण असून आपले हृदय निरोगी ठेवण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम, व्यसनाचा त्याग, संतुलित वजन, मधुमेह, मानसिक साथ, सकारात्मक विचारशैली इत्यादि बाबींचे महत्व वर्णन केले. तसेच वैद्यकिय अधिकारी डॉ लीना मुसळे यांनी हृदयाशी संबंधी आजारांची लक्षणे जसे छातीत दुखणे, छाती जड वाहणे. अती प्रमाणात घाम येणे, श्वास घ्यायला त्रास होणे, अनुवंशिकता इत्यादि बद्दल माहिती दिली. तसेच प्रतिबंधात्मक उपाय, तपासण्या व उपचाराबद्दल माहिती दिली. यावेळी  रुग्ण व त्यांचे नातलग,सहकारी, स्थानिक नागरीक तसेच रुग्णालयीन सर्व वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अधिपरीवारीका श्रीमती सुहास पुडके यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनाकरीता श्रीमती मनिषा धुंदाळे व रुग्णालयीन कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

spot_img