महिलावरील अत्याचार दर्शक रांगोळीने वेधले लक्ष.
सावर येथे नवरात्रोत्सवा निमित्त रांगोळी स्पर्धेचे आयोजन
दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा : बाभुळगाव
बाभुळगाव तालुक्यातील सावर येथील जय अंबे दुर्गा उत्सव मंडळास २५ वर्ष पूर्ण झाल्या बद्दल रौप्य महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मंडळातर्फे दररोज विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व इतर कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या कौशल्याला व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या साठी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सार्वजनिक वाचनालय सावर व स्टार न्युज मराठी या वृत्तवाहिनी च्या संयुक्त विद्यमाने दिनांक ६ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता रांगोळी स्पर्धाचे आयोजन मातामाय मंदिराच्या प्रांगणात करण्यात आले होते. या रांगोळी स्पर्धेत शाळकरी विद्यार्थीनी, महिलांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग घेतला..
गेल्या काही दिवसात घडलेल्या महिला अत्याचारांच्या प्रकरणामुळे समाज हेलावून गेला.त्याची प्रचिती, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सार्वजनिक वाचनालय व स्टार न्युज मराठी या वृत्तवाहिनी तर्फे नवरात्र दुर्गा उत्सव निमित्त रविवारी आयोजित रांगोळी स्पर्धेत आली.रांगोळी स्पर्धेत महिला अत्याचाराच्या विषय स्पर्धकांनी जोरकसपणे मांडला. महिलांची विविध क्षेत्रातील भरारी, महिला अत्याचार, बेटी बचाव बेटी पढाओ, व्यसनमुक्ती,स्त्रीभ्रूणहत्या, मुलींचे शिक्षण, पर्यावरण आदी विषयावर खूप छान संदेश देणाऱ्या रांगोळ्या या वेळी रेखाटण्यात आल्या होत्या. त्यातून समाजाने महिलांच्या प्रश्नाकडे, सुरक्षेकडे गांभीर्याने पाण्याचा संदेश दिला, विशेष म्हणजे अत्यंत चिंतनशील रांगोळ्यातून स्पर्धकांनी देशभरात महिलावर होणाऱ्या अत्याचाराचा विषय रेखाटलेल्या रांगोळीने सर्वांचे लक्ष वेधले होते. या रेखाटलेल्या रांगोळीचे निरीक्षकाकडून निरीक्षण करण्यात आले. येत्या १० ऑक्टोबरला बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, विजेत्यांना, व सहभाग घेणाऱ्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.या रांगोळीचे निरीक्षण, सावर येथील सरपंच सौ.मंदा दिनेश गुल्हाणे, सुनील क्षीरसागर, संतोष ठाकरे, प्रशांत चौधरी, योगेश लांडगे, जोस्ना खोपे, रीना दिघाडे, सरफराज पठाण, पंकज लांडगे, मोहन पारधी, आकाश कुंभेकार,वैभव देऊळकर, यांनी केले तर कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शिवानी साउळकर, अमित संगेवार, गोवर्धन गुल्हाने,राजेश शिरभाते, सुधीर लांडगे, निलेश शिरभाते आदींनी परिश्रम घेतले.