बाभूळगाव तालुक्यातील वाटखेड बु. येथे शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या
वाटखेड बु. या गावातील दोन महिन्यातील तिसरी आत्महत्या
दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा | बाभूळगाव :-
मारोती कवडुजी ब्राम्हणकर वय ६० वर्षे, रा. वाटखेड बु. यांनी सततच्या नापिकीला कंटाळून आत्महत्या केली. ही घटना दि. ९ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजता उघडकीस आली. या घटनेमुळे वाटखेड बु. या गावात दोन महिन्यातील ही तिसरी शेतकरी आत्महत्या आहे.
मारोती ब्राम्हणकर यांचेकडे वाटखेड शेत शिवारात 3 एकर शेती असुन ती शेती ते स्वताच वहीती करत होते. शेती वहीती करीता बँकेकडुन कर्ज व काही नातेवाईकांकडुन उसनवारीने पैसे घेतले होते. परंतु मागील काही वर्षापासुन शेतात सतत नापीकी होत असल्याने व पाहीजे तसे पीक होत नसल्याने मारोती हा सतत उदास राहत होता. ०९ रोजी चे दुपारी १२.३० वा दरम्यान शोभा मारोती कवडुजी ब्राम्हणकर यांनी मृतकाचा भाऊ दिपक यास घरी येवुन सांगितले की, तुमच्या भावाची तब्येत ठीक नाही ते कसे तरी करत आहेत. त्यावरून दिपक लगेच वहिनी सोबत त्याचे घरी गेला असता मारोती कसेतरी करीत होता व त्याचे तोंडाचा विषारी औषधाचा वास येत होता. त्यामुळे त्याला अँटोरिक्षा मध्ये टाकुन उपचारा करिता ग्रामीण रुग्नालय बाभुळगाव येथे आणले असता डॉक्टरानी त्यांना तपासुन ते मरण पावल्याचे सांगितले. यावरून मारोती यांनी विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या घटना घडली आहे. वाटखेड बु. या गावातील गत दोन महिन्यातील ही तिसरी शेतकरी आत्महत्या आहे.