Homeमहाराष्ट्रबाभुळगाव*विनंती थांब्यावर बसेस थांबविण्यासाठी विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन*

*विनंती थांब्यावर बसेस थांबविण्यासाठी विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन*

विनंती थांब्यावर बसेस थांबविण्यासाठी विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन

वाहतूक नियंत्रकाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन घेतले मागे

दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा | बाभूळगाव:-

येथील मातोश्री नानीबाई घारफळकर विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी बाभूळगाव रस्त्यावर विनंती बस थांबा विभाग नियंत्रक यवतमाळ यांनी दिला आहे. तरीही यवतमाळ, नेर व राळेगाव आगाराच्या बाभूळगाव मार्गे जाणा-या बसेस या ठिकाणी थांबत नसल्याने विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. दिलेल्या थांब्यावर बसेस थांबवा या मागणीसाठी आज दि. ११ रोजी दुपारी १२ वाजता विद्यार्थी, विद्यार्थींनी बाभूळगाव बस स्थानकात बस गाड्यांसमोर ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर वाहतूक नियंत्रकाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

                घारफळकर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी बाभूळगाव रस्त्यावर विनंती बस थांबा देण्यात आलेला आहे. यवतमाळ विभाग नियंत्रकांनी  एप्रिल महिन्यातच नेर व राळेगाव आगार प्रमुखांना पत्र देवून सदर ठिकाणी बसेस थांबविण्याबाबत कळविले होते. बसेसच्या चालक, वाहकांना विद्यार्थ्यांनी याबाबत सांगितल्यास विद्यार्थ्यांशी ते हुज्जत घालतात, तुमच्या शहरात प्रयेक ठिकाणी थांबाव का, असा प्रतिप्रश्न करतात. त्यामुळे चालक, वाहकांच्या वर्तवणूकिला वैतागलेल्या विद्यार्थ्यांनी बस स्थानकावर ठिय्या आंदोलन केले. अखेर वाहतूक नियंत्रक प्रशांत भोयर यांनी विद्यार्थ्यांची समजूत काढून बसेस थांबण्यासाठी लेखी आश्वासन दिले. तसेच ज्या बसेस थांबणार नाहीत त्यांची लेखी तक्रार करा, असेही सांगितले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी विद्यालयातील, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

spot_img