Homeयवतमाळनिळोणा धरणात बाभूळगाव तालुक्यातील विरखेडचा तरुण बुडाला

निळोणा धरणात बाभूळगाव तालुक्यातील विरखेडचा तरुण बुडाला

निळोणा धरणात बाभूळगाव तालुक्यातील विरखेडचा तरुण बुडाला

दुसऱ्या दिवशी मृतदेहच लागला हाती

दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा | यवतमाळ :-

यवतमाळ येथील निळोणा धरण परिसरात पोहण्याकरिता गेलेल्या एका युवकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली.  सायंकाळी उशिरापर्यंत त्या युवकाचा मृतदेह आढळून आला नव्हता. दरम्यान, गुरुवारी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने केलेल्या शोधमोहीमेत त्याचा मृतदेह आढळला. अभिजीत उर्फ कुणाल गजानन सोयाम वय २० वर्ष रा. विरखेड, ता. बाभूळगाव असे मृतक युवक (विद्यार्थ्या)चे नाव आहे.

प्राप्त माहिती अनुसार अभिजीत हा त्याचा काही मित्रांसोबत निळोणा धरण परिसरात गेला होता. यादरम्यान तो पोहण्यासाठी पाण्यात उतरला, परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडला. ही गोष्ट त्याच्या मित्रांच्या लक्षात येताच त्यांनी अभिजीतला वाचवण्याचा शर्ती चा प्रयत्न केला,  परंतु त्याला वाचवण्यात त्यांना अपयश आले. त्यांनी आरडा ओरड सुद्धा केली. परंतु त्या ठिकाणी कुणीही आले नाही. सायंकाळी उशिरापर्यंत त्याचा मृतदेह आढळून आला नाही.  याची माहिती उपस्थितांनी तहसीलदारांना दिली. तहसीलदारांनी घटनास्थळी पथक पाठविले. परंतु अंधार असल्यामुळे शोधमोहीम अर्धवटच राहिली. दरम्यान, गुरुवारी सकाळी राबविलेल्या शोधमोहीमेत अभिजीत उर्फ कुणाल सोयाम याचा मृतदेह पथकाच्या हाती लागला. यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला. तो यवतमाळ येथे शिक्षण घेण्यासाठी मावशीकडे राहत होता. त्याचे मागे आजोबा, वडील, आई, धाकटी बहीण आहे.  या प्रकरणाचा पुढील तपास यवतमाळ ग्रामिण पोलिस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

spot_img