Homeमहाराष्ट्रप्रकल्पबाधितांच्या विकासासाठी महामंडळ स्थापन

प्रकल्पबाधितांच्या विकासासाठी महामंडळ स्थापन

प्रकल्पबाधितांच्या विकासासाठी महामंडळ स्थापन

बेंबळा प्रकल्पग्रस्तांतर्फे आ.डॉ. उईके यांचा सत्कार

दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा | बाभूळगाव :

राज्य शासनाने राज्यातील सर्व प्रकल्पबाधित प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व विकासासाठी नागनाथ अण्णा नायकवडी महामंडळाची १० ऑक्टोबरला स्थापना केली. राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके यांनी प्रकल्पग्रस्तांसाठी महामंडळ स्थापन व्हावे म्हणून शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून या निर्णयामुळे बेंबळा प्रकल्पग्रस्तांनी समाधान व्यक्त केले. या कार्यासाठी बेंबळा प्रकल्पग्रस्त समितीने आ.डॉे. उईके यांची त्यांच्या यवतमाळ येथील कार्यालयात भेट घेवून शाल, श्रीफळ देऊन सन्मान केला व त्यांचे आभार मानले.

बेंबळा प्रकल्पग्रस्त समितीने आ.डॉ. अशोक उईके यांच्याकडे बेंबळा प्रकल्पग्रस्तांच्या विकासासाठी व पुनर्वसनाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी महामंडळाची स्थापन करण्यात यावी, अशी मागणी केली होती. डॉ. उईके यांनी १० ऑगस्ट रोजी बेंबळा प्रकल्पग्रस्त समितीची बैठक राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लावली. त्यामध्ये प्रकल्पग्रस्तांसाठी महामंडळ यासह विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी एक महिन्यात महामंडळ स्थापन करण्याचे आश्‍वासन यावेळी समितीच्या सदस्यांना दिले होते. त्यानुसार त्यांनी शब्द पाळला व राज्यभरातील प्रकल्पग्रस्तांच्या विकासासाठी नागनाथ अण्णा नायकवडी महामंडळाची स्थापना केली आहे. यानिमित्त बेंबळा प्रकल्पग्रस्तांसाठी महामंडळ स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतल्याने बाभूळगाव तालुक्यातील बेंबळा प्रकल्पग्रस्त समितीच्या वतीने आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बेंबळा प्रकल्पग्रस्त समितीचे सोमेश चौधरी,रमेशराव भोयर, बाबाराव काळबांडे, बंडूजी गंधे, भास्करराव भोयर, मनोज वानखडे, जीवन ठाकरे, डॉ. रवींद्र कोटेचा, सारंग इंगळे, विजय ठाकरे, प्रकाश राऊत, प्रफुल्ल झोड, विक्की सोळंके,प्रकाश पवार संतोष भाकरे आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

spot_img