यवतमाळ बसस्थानकाचे मुख्यमंत्र्यांनी केले ऑनलाईन लोकार्पण.
दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा। यवतमाळ :
यवतमाळच्या नवीन बस स्थानकाच्या इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते आज दिनांक १४ सप्टेंबर रोजी मुंबईवरून दृक्श्राव्य पद्धतीने (ऑनलाइन) करण्यात आले. स्थानिक यवतमाळ येथे नूतन बसस्थानकावर आमदार मदन येरावार यांनी प्रत्यक्षात फीत कापून उदघाटन केले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बसस्थानकावरून प्रायोगिक स्वरूपात बस सोडण्यात आली. गेल्या पाच वर्षांपासून या नवीन बस स्थानकाचे बांधकाम सुरू होते आज ते पूर्णत्वास झाल्यानंतर प्रवाशांच्या सेवेत हे बसस्थानक सुरू झाले. मात्र कुठल्याही क्षणी निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्यानेच लगबगीने मुंबईवरून या बसस्थानकचे लोकार्पण करण्यात आले. अशी चर्चा जिल्हाभरात रंगू लागली आहे.