आर.एन.न्युज चॅनलच्या वतीने डाॅ. अब्दुल कलाम यांना आदरांजली
बाभूळगाव तालुक्यातील शेतकरी दांपत्यांचा केला सत्कार
दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा | बाभूळगाव :
भारत रत्न, माजी राष्ट्रपती डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आजाद यांच्या जयंतीच्या निमित्ताने तसेच आर.एन.न्युज चॅनलच्या १५ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून बाभूळगाव तालुक्यातील कष्टकरी, शेतकरी दांपत्यांचा भव्य सत्कार सोहळ्याचे आर.एन.न्युज चॅनलच्या वतीने आयोजन आले. या निमित्त दि. १५ आॅक्टोबर रोजी आर.एन.न्युज चॅनलचे कार्यालय, हर्षिता नगरी, बाभूळगाव येथे भव्य कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मार्गदर्शक म्हणून प्रगतीशील शेतकरी रमेश रा. साखरकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन अशोक मारोती मेश्राम, निवृत्त पोलीस अधिकारी यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ॲड.इम्राण देशमुख, प्रसिद्ध विधीतज्ञ, यवतमाळ हे होते. विशेष सत्कारमुर्ती डॉ.लिना मुसळे (मानकर), वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय बाभुळगाव, प्रमुख उपस्थिती सौ. मिरा पागोरे, तहसीलदार बाभूळगाव, हेमंत ठाकरे, माजी सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, बाभूळगाव, अक्षय गुगलिया, उद्योजक, यवतमाळ, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब गौरकार, श्री गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हा सेवाधिकारी पद्माकर ठाकरे, नायब तहसीलदार राऊत मॅडम, डॉ. सुशील बत्तलवार, आर.एन.न्यूजचे मुख्य संपादक नईम मुल्ला व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रगतीशील शेतकरी रमेश रा. साखरकार यांनी कमी खर्चात जास्त उत्पन्न कसे घ्यायचे या संबंधी मार्गदर्शन केले. तसेच यावेळी त्यांच्या २६७ प्रकारचे देसी बियाणे यांची प्रदर्शनी लावण्यात आली. आपल्या अध्यक्षीय भाषणात इम्रान देशमुख यांनी सांगितले कि, डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आजाद साहेबांचं संपुर्ण जीवन हे आदर्श घेण्यासाठीच आहे. महापुरुषांच्या जयंती साजऱ्या करण्यामागे खूप मोठा विचार आहे. माणसाने अस जीवन जगावे की त्याचा दुसऱ्याला फायदा झाला पाहिजे. गावा-गावात सर्व समाजातील लोकांनी एकोप्याने राहणे हे देशाच्या एकात्मतेसाठी केलेले एक महत्वाच काम आहे. कार्यक्रमाचे संचालन मुख्याध्यापक खुशाल ठाकरे यांनी केले तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन आर.एन.न्यूजच्या वृत्त निवेदिका रोशनी मांडवगडे यांनी केले. यावेळी तालुक्यातील ३० शेतकरी दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रशासन व गाव-गावातील दुवा असणाऱ्या पोलीस पाटील यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी आर.एन.न्यूजच्या सर्व सहकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.