बाभुळगाव तहसील कडून मतदार जनजागृती.
दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा । बाभुळगाव
तहसील कार्यालय बाभुळगाव यांच्यावतीने स्वीप अंतर्गत मतदार जनजागृती कार्यक्रम दिनांक 16 ऑक्टोबर रोजी स्थानिक प्रताप विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बाभुळगाव येथे आयोजित करण्यात आला.यावेळी अध्यक्षस्थानी सुभाषराव घोडे, अध्यक्ष प्रताप शिक्षण मंडळ, सचिव जयंतराव घोंगे, मुख्य मार्गदर्शिका मीरा पागोरे तहसीलदार बाभुळगाव, गणेश मैघणे गट शिक्षणाधिकारी पं. स. बाभुळगाव, मंगेश देशपांडे गट शिक्षणाधिकारी नेर,मंगेश गाढवे निरीक्षक, केंद्रप्रमुख शेख सर, प्राचार्या स्वाती घोडे ,मनोज नगराळे पर्यवेक्षक मंचावर उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार पागोरे यांनी मतदान लोकशाही बळकट करण्यासाठी अत्यावश्यक असल्याचे सांगितले. मैघणे व देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना जनजागृती दूत म्हणून आपण जागृती करावी असे आवाहन केले. घोडे मॅडम यांनी भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही असणारा देश आहे असे सांगितले लोकशाही वाचवायची असेल तर मतदान केलेच पाहिजे. यावेळी जन जागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. सूत्रसंचालन शशिकांत कापसे ,ज्योती गिरी यांनी तर आभार प्रदर्शन देवेंद्र आत्राम या