राष्ट्रीय तबला वादन स्पर्धेत विराज वानखडेचे सुयश
छत्तीसगड राज्यातील भिलाई येथे स्पर्धांचे आयोजन
दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा । बाभूळगाव :-
छत्तीसगड राज्यातील भिलाई येथे नुकतीच राष्ट्रीय कल्चरल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात नृत्य, गायन, चित्रकला, तबलावादन स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत यवतमाळ येथील यवतमाळ पब्लीक स्कुलचा विद्यार्थी विराज सतिश वानखडे याला 12 ते 15 वयोगटात तबला वादन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला आहे. त्याचे श्रेय तो श्री अॅकॅडमीचे संचालक नरेंद्र पाटणे, आई मंगला वानखडे, वडील सतिश वानखडे, कृष्णाभाऊ कडू, शिक्षीका योगीता वडतकर, प्राचार्या कडाव मॅडम, शिक्षिका शीरीन यांना देतो. विशेष म्हणजे या स्पर्धेत यवतमाळ पब्लीक स्कुलचे कृष्णा माळवी, शिवराज गावंडे व विराज वानखडे या तीन विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून आपापल्या गटात प्रथम आले. विराजचे वडील सतिश वानखडे हे बाभूळगाव तालुक्यातील यरणगाव येथील रहिवाशी असून शेतीचा व्यवसाय करतात. विराजच्या या यशाने बाभूळगाव तालुक्याचे नाव देशपातळीवर कोरले गेले आहे. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.