Homeयवतमाळअशोक मेश्राम यांना राळेगाव मतदार संघात वाढता जनाधार ... !

अशोक मेश्राम यांना राळेगाव मतदार संघात वाढता जनाधार … !

अशोक मेश्राम यांना राळेगाव मतदार संघात वाढता जनाधार … !

कॉंग्रेसची तिकीट मिळविण्यासाठी आहेत प्रयत्नशील

दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा | समीर शिंदे| यवतमाळ :

राळेगाव विधानसभा मतदारसंघासाठी भाजपा चे अधिकृत उमेदवार म्हणून विद्यमान आमदार डॉ.अशोक उईके यांचे नाव घोषित करण्यात आले आहे. तर २४ ऑक्टोबरला ते नामांकन सुद्धा दाखल करणार आहेत. मात्र अजूनही महाविकास आघाडी च्या वतीने कॉग्रेस पक्षाचे माजी मंत्री  प्रा. वसंत पुरके यांचेसह अशोक मारोती मेश्राम, किरण कुमरे यांच्यात रस्सीखेच सुरु असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सरांची उमेदवारी अजून तरी ‘अधांतरी’ असल्याचे दिसून येत आहे. त्यातही दिल्ली दरबारी ठाण मांडून असलेल्या अशोक मेश्राम यांचे पारडे जड असल्याची चर्चा मतदार संघात सुरु आहे…

गेल्या सहा महिन्यांपासून राळेगाव मतदार संघात काँग्रेसचा नवा चेहरा म्हणून अशोक मेश्राम यांच्याकडे जनता पाहत असल्याचे दिसून आले आहे. अशोक मेश्राम यांनी सेवानिवृत्तीनंतर स्वतःला जनतेच्या सेवेसाठी वाहून घेतले आहे. आता तिकीट वाटपाच्यावेळी अनेकजण रांगेत असले तरी त्यांना जनतेचा सेवक म्हणून जनतेचा जनाधार असल्याचे दिसून येते. गेल्या विस वर्षांपासून राळेगाव मतदार संघातील जनता त्याच त्या दोन चेह-यांना पाहून आता वैतागल्याचे दिसून येत आहे. जनताही आता बदल हवा असेल तर युवा नेतृत्त्व, दमदार कर्तृत्व असलेला नवा चेहरा काँग्रेसने द्यावा अशी जणू मागणीच करीत आहे. अशोक मेश्राम यांनी मतदार संघ पिंजुन काढला असून काँग्रेसच्या प्रत्येक तालुक्यातील नेते, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी त्यांनी घेवून काम सुरू केलेे असल्याचे दाखवून दिले आहे. तिकीट मागण्यासाठी रांगेत असलेल्यांना धोबीपछाड देणारा उमेदवार आता काँग्रेसपक्षाने द्यावा अशी अपेक्षा मतदारांसह कार्यकर्त्यांना लागली आहे. दरम्यान, काँग्रेस पक्षामध्ये अंतर्गत मतभेद आणि कलहाचा फटका राळेगाव मतदार संघात दिसून येत आहे. काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाबद्दल अनेक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असून, यामुळे पक्षाच्या आगामी निवडणुकीतील कामगिरीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मतदार संघातील जनतेच्या मनात एकच प्रश्न आहे की, काँग्रेसचा नवीन चेहरा राळेगावमधील राजकीय समीकरणं बदलणार का?.

सध्या मतदार संघात अशोक मेश्राम यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. राळेगाव मतदारसंघास नवा चेहरा मिळणार काय ?  अशीही चर्चा सध्या सुरु आहे.  दरम्यान पुरके सर दिल्लीवरून परत आल्याचे समजले आहे. त्यामुळे कॉंग्रेसची तिकीट कुणाला मिळेल हे अजूनही गुलदस्त्यात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

spot_img