प्रवासी घेऊन जाणाऱ्या धावत्या बसने घेतला पेट – लालपरी जाळून खाक.
दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा । यवतमाळ
प्रवासी घेऊन यवतमाळ कडे परत येणारी एसटी महामंडळाची बस ने अचानक पेट घेतल्याने बस जळून खाक झाल्याची घटना यवतमाळच्या धामणगाव मार्गावरील मोहा फाट्याजवळ आज दी.31 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता च्या दरम्यान घडली. चालकाच्या सतर्कतेमुळे सर्व प्रवासी सुखरूप पणे बाहेर काढण्यात आले.यामुळे प्राणहानी टळली.सदर बसच्या इंजिनच्या अंतर्भागात बिघाड झाल्याने अग्नीच्या ठिणग्या पडल्या.ही बाब चालकाच्या त्वरित ध्यानात आल्याने चालकाने सर्वच प्रवाश्यांना तातडीने बस खाली उतरविले.त्यानंतर बसला लागलेल्या आगीने तत्काळ रौद्ररूप धारण केले.परंतु तोवर सर्व प्रवासी सुखरूप बसबाहेर निघाले होते.त्यामुळे प्राणहानी वाचली. दिवाळी पूर्वी घडलेल्या भीषण घटनेतून दैव योगाने सर्वच प्रवाशांचे प्राण वाचल्याने उपस्थित प्रवश्यांनी ईश्वराचे आभार मानले. प्रवासी घेऊन जाणाऱ्या धावत्या बसने घेतला पेट – लालपरी जाळून खाक.दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा । यवतमाळप्रवासी घेऊन यवतमाळ कडे परत येणारी एसटी महामंडळाची बस ने अचानक पेट घेतल्याने बस जळून खाक झाल्याची घटना यवतमाळच्या धामणगाव मार्गावरील मोहा फाट्याजवळ आज दी.31 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता च्या दरम्यान घडली. चालकाच्या सतर्कतेमुळे सर्व प्रवासी सुखरूप पणे बाहेर काढण्यात आले.यामुळे प्राणहानी टळली.सदर बसच्या इंजिनच्या अंतर्भागात बिघाड झाल्याने अग्नीच्या ठिणग्या पडल्या.ही बाब चालकाच्या त्वरित ध्यानात आल्याने चालकाने सर्वच प्रवाश्यांना तातडीने बस खाली उतरविले.त्यानंतर बसला लागलेल्या आगीने तत्काळ रौद्ररूप धारण केले.परंतु तोवर सर्व प्रवासी सुखरूप बसबाहेर निघाले होते.त्यामुळे प्राणहानी वाचली. दिवाळी पूर्वी घडलेल्या भीषण घटनेतून दैव योगाने सर्वच प्रवाशांचे प्राण वाचल्याने उपस्थित प्रवश्यांनी ईश्वराचे आभार मानले.