निवडणुकी दरम्यान पोलिस प्रशासन सज्ज.
रूटमार्च द्वारे केली बाभुळगाव शहराची पाहणी.
दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा। बाभुळगाव
आगामी काळात होवू घातलेल्या विधानसभा निवडणूक प्रक्रिये दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्याचे जवाबदारी पोलिस प्रशासनावर आहे.यानिमित्ताने पोलिस विभागाने केंद्रीय राखीव पोलिस दलाची ५० महिला जवानांची एक तुकडी यवतमाळ मुख्यालयी दाखल झाली आहे. ही तुकडी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याची पाहणी व रस्ते पडताळणी करणार असून याचाच एक भाग म्हणून आज दिनांक ४. नोव्हेंबर रोजी बाभुळगाव शहरातील मुख्य मार्गावरून रूट मार्च द्वारे पाहणी करण्यात आली. सदर रूट मार्च बाभुळगावचे पोलिस निरीक्षक लहुजी तावरे यांचे मार्गदर्शनात काढण्यात आला.यात पंजाब व हरियाणा येथून पाचारण करण्यात आलेले केंद्रीय राखीव पोलीस दलासह बाभुळगाव पोलिस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.