महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. वसंत पुरके यांच्या प्रचारार्थ
बाभूळगावात डॉ. कन्हैय्याकुमारची जाहीर सभा
दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा | बाभूळगाव :-
काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय युवा नेता असलेल्या डॉ. कन्हैय्याकुमार यांची जाहीर सभा गुरूवार, दि. 14 रोजी दुपारी 1.00 घोडूभाई मैदान बाभूळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रा. वसंत चिंधूजी पुरके यांच्या प्रचारार्थ डॉ. कन्हैय्याकुमार बाभूळगावात येत आहेत. या निमित्तान काँग्रेसच्या एका युवा नेतृत्त्वाची तोफ प्रचारकामी धडाडणार असल्याचे दिसून येते. डॉ. कन्हैय्याकुमार यांचे प्रभावशाली भाषण ऐकण्याची उत्सुकता बाभूळगाव वासीयांमध्ये निर्माण झाली आहे. काँग्रेस-महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रा. वसंत पुरके यांच्या विधानभा निवडणूक 2024 च्या प्रचारार्थ बाभूळगाव येथे वरीष्ठ पातळीवरील नेत्याची ही पहिलीच सभा आहे. याआधी मोठेमोठ्या दिग्गज नेत्यांनी राळेगाव येथे येवून सभा गाजविल्या आहेत. आता पहिल्यांदा बाभूळगाव वासियांना धडाकेबाज विचार ऐकण्याची संधी या निमित्ताने मिळत आहे. असे मत येथील मतदार व्यक्त करीत आहे. या सभेला रेकाॅर्डब्रेक गर्दी होईल, असे कार्यकर्त्यांकडून बोलले जात आहे.