Homeधर्म / समाजवैशिष्ट्यपुर्ण शोभायात्रेने बाभूळगावकरांचे वेधले लक्ष !

वैशिष्ट्यपुर्ण शोभायात्रेने बाभूळगावकरांचे वेधले लक्ष !

वैशिष्ट्यपुर्ण शोभायात्रेने बाभूळगावकरांचे वेधले लक्ष !

बाभूळगाव येथे बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा | बाभूळगाव

इंग्रजांच्या जुलुमी राजवटीविरूध्द ‘उलगुलान’ पूकारणारे जननायक क्रांतीकारी बिरसा मुंडा यांची १४९ वी जयंती बाभूळगाव येथे बिरसा उत्सव समितीच्या वतीने दि. १५ रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी ११ वाजता इंदिरा नगर येथिल भिमालपेन देवस्थान येथून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. त्यानंतर शिवाजी चौकाजवळ असलेल्या भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून आरती करण्यात आली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ढोल ताशा, वाद्यांच्या गजरात शहरातून निघालेल्या वैशिष्ट्यपुर्ण शोभायात्रेने बाभूळगाववासियांचे लक्ष वेधले.

                देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी, आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी शहीद झालेल्या क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या अस्तित्वाची ओळख व्हावी व त्यांनी घडवलेल्या क्रांतिकारी इतिहासाची या युगात सदैव आठवण व्हावी या करीता दरवर्षी प्रमाणे याही वर्षी बिरसा उत्सव समितीच्या वतीने जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी  खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष श्रीकांत कापसे, उपनगराध्यक्ष श्याम जगताप, नगर सेविका रेणुका सोयाम, अंकुश सोयाम, नगर सेवक चंद्रशेखर परचाके, अमर शिरसाठ, अनिकेत पोहोकार, अक्षय राऊत, शिवसेना शहर प्रमुख प्रवीण लांजेकार,प्रसिद्धी प्रमुख विक्रम बऱ्हाणपूरे, प्रकाशचंद छाजेड, प्रकाश भस्मे, भारत इंगोले, अरुण पंधरे, संदीप पेंदोर, सुभाष मसराम, सुनील मडावी, गुणवंत वरखडे, किशोर मेश्राम, गणेश उईके, विनोद अर्के, राहुल गेडाम, संजय परचाके, वलके, रमेश गेडाम, विनोद परचाके, गणेश जूमनाके, सचिन सोयाम, अशोक मडावी, नाना अर्जुने, विजय सोनवणे, नीलकंठ मडावी, सागर तोडसाम, किशोर अर्के , आकाश अर्के,गोकुल सोयाम, प्रविण गाजलेकर, योगेश बारेकर, देविदास राणे, शांताबाई परचाके, पूजा परचाके, मीना वरखडे, सोनू गेडाम, आशा जूमनाके, गिरीजा अर्के, अलका सोयाम, माला गेडाम, ललिता मडावी, शीला तोडसाम, मनीषा सोयाम, पायल तोडसाम, प्रतिभा भस्मे, नंदा डडमल, रुखमाबाई गाजलेकर, यांच्या सह  समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

spot_img