बाभूळगाव येथे बाळासाहेब ठाकरे पुण्यतिथी साजरी दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा । बाभुळगाव
हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी दि. १७ रोजी साजरी करण्यात आली. येथील शिवछत्रपती चौकातील शिवाजी पार्क येथे छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख सचिन महल्ले, तालुका संघटक विजय भेंडे, शहर प्रमुख प्रवीण लांजेकर, नगर सेवक अभय तातेड, नितीन महालगावे, विक्रम बऱ्हाणपुरे, सचिन माटोडे, गजानन वानखेडे, रवी काळे, सचिन मालखेडे, नंदकिशोर लांडे, नितीन टोने, चंदू बोरकर, नरेश सातपुते, मोहन कुकडे, धनराज शिंदे, जयंत ढोबळे, योगेश दानव, शंतनू फुसे, विनोद काळे, रवी चव्हाण, निलेश खोडे, गजानन सावसाकडे आदी उपस्थित होते.