Homeमहाराष्ट्रबाभुळगावकोठा फत्तेपूर येथे ट्रकने दुचाकीवरील दोघांना चिरडले

कोठा फत्तेपूर येथे ट्रकने दुचाकीवरील दोघांना चिरडले

कोठा फत्तेपूर येथे ट्रकने दुचाकीवरील दोघांना चिरडले

बाभूळगाव तालुक्यातील घटना, पती-पत्नी जागीच ठार

दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा | बाभूळगाव :

रस्त्याच्या बांधकामावर गिट्टी भरून नेण्यासाठी वापरण्यात येणा-या अशोक लेलँड ट्रकने दुचाकीस्वारास धडक दिल्यानंतर त्यावरील दोघांनाही चिरडले. यात दुचाकीवरील पती-पत्नी जागीच ठार झाले. ही घटना दि. 21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजताचे सुमारास कोठा फत्तेपूर नजीक घडली. यातील मृतक महादेव शंकर हटवार वय 55 वर्षे, सौ. मायाबाई महादेव हटवार वय 52 वर्षे, हे दोघेही कोठा फत्तेपूर येथील रहीवासी आहेत. 

प्राप्त माहितीनुसार, दि. 21 रोजी महादेव हटवार व त्यांची पत्नी मायाबाई हे दाम्पत्य अमरावती जिल्ह्यातील धामणगाव नजीक असलेल्या निंभोरा गावी नातेवाईकाडे स्वतःची  पॅशन प्रो या दुचाकी क्र. एम.एच 29 डब्ल्यु 3424 ने अंत्यविधीसाठी गेले होते. तेथून गावी परत येत असताना गावाकडे जाणा-या रस्त्याचे काम चालू असल्याने त्या ठिकाणी गिट्टीचे ढीग लावलेले होते, त्याला वाचवत घरी जात होते. त्याच दरम्यान भरधाव वेगाने येणाऱ्या रस्त्याच्या कामावरील अशोक लेलँड ट्रक क्र. एम.एच. 27 बी एक्स 9364 ने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील दोघेही खाली कोसळले, दरम्यान त्याच ट्रकखाली आल्याने त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा होवून दोघेही जागीच गतप्राण झाले. या अपघातानंतर ट्रक चालक शेख हसन शेख गफुर, वय 47 वर्षे रा. चांदूर रेल्वे हा घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच मृतकाचा धाकटा भाऊ देविदास शंकर हटवार काही गावक-यांसह घटनास्थळी पोहचला. मृतकांना बाभूळगाव ग्रामीण रूग्णालयात आणले. या प्रकरणी देविदास शंकर हटवार यांच्या फिर्यादीवरून पोलीसांनी ट्रक चालका विरूध्द निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात केल्याचा गुन्हा दाखल करून अटक केली. अधिक तपास पोलीस निरीक्षक एल.डी.तावरे यांच्या मार्गदर्शनात सहायक फौजदार दिपक आसकर करीत आहे. या घटनेने फत्तेपूर गावात शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

spot_img