बाभुळगाव तालुक्यातील वेणी कसबा गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व गजाननराव नाईकवाड (महाराज) यांचे दि. २२ नोव्हेंबर रोजी रात्री ११.३० वाजताच्या दरम्यान वृद्धापकाळाने निधन झाले.मृत्युसमयी ते ८० वर्षाचे होते. त्यांचे बाभुळगांव तालुक्यामध्ये सामाजिक कार्यात फार मोठे योगदान होते. त्यांची विचारसरणी राष्ट्रपिता महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांचे विचाराशी सुसंगत होती. ते मागील ५५ वर्षापासून कॅाग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ता होते. त्यांनी आपल्या राजकीय जीवनामध्ये बाभुळगांव तालुका मध्ये अनेक पदा वर काम केले.त्यांनी स्वतःला आध्यात्मीक विचारधारेला वाहून घेतले होते. त्यांनी आयुष्यभर संत तुकाराम महाराज, राष्टसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी संत गाडगेबाबा यांचे विचारानुसार कर्म करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या विचारावर आध्यात्माचा फार मोठा पगडा असून ते वारकरी संप्रदायाचे अनुयायी होते. बाभुळगांव तालुक्यामध्ये त्यांचा फार मोठा अध्यात्मिक व राजकीय चाहता वर्ग आहे. त्यांचे अंत्यविधीला बाभुळगांव तालुक्यातील जनसमुदाय उपस्थित होता.