Homeखेळ आणि मनोरंजनप्रताप विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे थाटात उद्घाटन

प्रताप विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे थाटात उद्घाटन

प्रताप विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे थाटात उद्घाटन

खासदार संजय देशमुख, शिक्षक आमदार किरण सरनाईक, माजी मंत्री प्रा. वसंत पुरके यांची उपस्थिती

दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा | बाभूळगाव :

प्रताप विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालया वार्षिक स्नेहसंमेलनाचे दि. १ जानेवारी रोजी थाटात उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  माजी शिक्षण मंत्री प्रा. वसंत पुरके, उद्घाटक  खासदार संजय देशमुख, प्रमुख अतिथी म्हणून आमदार किरण सरनाईक,  जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड,  प्रताप शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुभाषराव घोडे, एडवोकेट सिद्धार्थ भारती, गणेश मोरे, ऐश्वर्या चव्हाण, निलेश बोरकर, बाळासाहेब  धांदे, गोपाळराव खडसे, प्रकाशचंद छाजेड, जयंत घोंगे सचिव प्रताप शिक्षण मंडळ, संचालक प्रभाकर ढोले, पद्माकर राऊत, राजेंद्र इंगोले, बाबाराव बहाड, डॉक्टर अनिल घोडे, सुरेश भोंडे, शशिकांत कापसे, मुख्याध्यापिका स्वाती घोडे, उपमुख्याध्यापक उमाकांत राठोड, पर्यवेक्षक मनोज नगराळे आदी मान्यवर  विचारपिठावर उपस्थित होते.

दीप प्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक मुख्याध्यापिका स्वाती घोडे यांनी केले. शिक्षक आमदार सरनाईक यांनी मराठी शाळेच्या विकासासाठी कठिबद्ध असल्याचे सांगितले यावेळी त्यांनी प्रताप विद्यालयाची प्रगती पाहून समाधान व्यक्त केले. खासदार संजय देशमुख यांनी क्रीडा संकुल ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. वसंत पुरके यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना शिक्षणाचे महत्त्व आणि शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमाचे महत्त्व सांगितले. स्नेहसंमेलनाचे आयोजन बघून मान्यवरांनी शाळेतील कर्मचाऱ्यांचे  कौतुक केले. यावेळी माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत तालुक्यातून शाळा प्रथम आल्याने आमदार किरण सरनाईक यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका  स्वाती घोडे यांचा तसेच संस्थेचे सचिव जयंत घोंगे यांचा खासदार संजय देशमुख यांनी शाल , श्रीफळ देवून सन्मान केला. यावेळी डिश डेकोरेशन, रांगोळी स्पर्धा आणि पुष्परचना या स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवेंद्र आत्राम आणि ज्योती गिरी यांनी केले. तर आभार प्रदर्शन शशिकांत कापसे यांनी केले. यावेळी संस्थेतील शिक्षक, विद्यार्थी, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

spot_img