Homeमहाराष्ट्रबाभुळगावबाभूळगावच्या जनता दरबारात समस्यांचा डोंगर !

बाभूळगावच्या जनता दरबारात समस्यांचा डोंगर !

बाभूळगावच्या जनता दरबारात समस्यांचा डोंगर !

— ना.डाॅ. उईकेंनी अधिका-यांची झाडाझडती घेत दिले कडक निर्देश —

। प्रविण लांजेकर | विक्रम बऱ्हाणपूरे |

तालुक्यातील जनतेच्या समस्यांचे निवारण करण्याच्या उद्देशाने तहसिल प्रशासनाच्या वतीने दि.7 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत आदिवासी विकास विभाग मंत्री तथा राळेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार डाॅ. अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबाराचे आयोजन तहसिल कार्यालय परिसरात करण्यात आले. यावेळी नागरिकांनी अनेक शासकीय विभागांशी संबंधीत समस्यांचा पाढा मंत्री महोदयापुढे वाचला. अनेक विभागांच्या तक्रारींचा अक्षरश: डोंगर रचला गेला. यावेळी व्यासपीठावर ना.डाॅ. अशोक उईके, उपविभागीय अधिकारी गोपाल देशपांडे, तहसिलदार मीरा पागोरे, सतीश मानलवार, प्रकाश भुमकाळे, हेमंत ठाकरे, नितीन परडखे, अनिकेत पोहोकार यांचे सह भाजपा पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते. या वेळी ना.डाॅ. उईकेंनी अधिका-यांची झाडाझडती घेत कडक निर्देश दिले.

      यावेळी तालुक्यातील गावांमध्ये सन 2011 पुर्वीपासन शासकीय जागांवर राहत असलेल्या रहिवाश्यांच्या जागा नियमाकुल करणे व त्यांना जागेचे पट्टे देण्यात यावे. या विषयावर नागरिकांनी अनेक ठिकाणच्या अतिक्रमण धारकांच्य समस्यां मांडल्या. यावेळी ना. डाॅ. उईके यांनी महसुल व पंचायत विभागाच्या अधिका-यांना याबाबत तत्काळ दखल घेण्याच्या सुचना केल्या. त्याच प्रमाणे तालुक्यातील विज समस्या सोडविण्यासाठी 220 के.व्ही. सबस्टेशनची आवश्यकता, बेंबळा प्रकल्पावर पर्यटन स्थळाचा विकास करणे, तालुक्यात औद्योगिक विकास अंतर्गत एमआयडीसीची निर्मिती करणे आदि महत्त्वपुर्ण प्रश्न नागरिकांनी यावेळी मांडले, त्यावर ना.डाॅ. उईके यांनी यावर शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

      या जनता दरबारमध्ये तालुकास्तरावरच्या महसुल, आरोग्य, बांधकाम, पंचायत, कृषी, पशुसंवर्धन, उमेद, नगर पंचायत, मनरेगा, पोलीस, बँक यासह विविध विभागाचे सुमारे 23 स्टाॅल लावण्यात आले होते. यावेळी ना. डाॅ. उईके यांनी दि. 7 ते 15 फेब्रुवारी पर्यंत सर्व विभागांना तक्रारी पोहचवा, 16 ते 28 फेब्रुवारी पर्यंत समस्यांचा निपटारा करावा जेणे करून मार्च महिन्यात नागरिकांसाठी समाधान शिबीराचे आयोजन करता येईल, असे निर्देश उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांना दिले. उपस्थितांचे आभार निवासी नायब तहसीलदार दिलीप बदकी यांनी मानले. यावेळी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, भाजपा पदिाधिकारी कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बेजबाबदार मुख्याधिका-यावर नागरिकांनी व्यक्त केला संताप !

यावेळी बाभूळगाव शहरातील नागरिकांनी विविध समस्या ना. डाॅ. उईके यांचे समोर मांडल्या. यामध्ये नगर पंचायतच्या मुख्याधिकारी सतत गैरहजर राहत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. शहरातील पाणी पुरवठा योजनेचे काम निकृष्ठ दर्जाचे होत असल्याचे रविंद्र काळे यांनी निदर्शनास आणून दिले. जनता दरबारात सुद्धा मुख्याधिकारी गैरहजर राहिल्या. यावेळी धरमचंद छल्लाणी, नगरसेवक अभय तातेड यांनी मुख्याधिका-यांच्या बेजबाबदारपणाचा मुद्दा मांडला. त्यावेळी ना.डाॅ. उईके यांनी उपविभागीय अधिकारी गोपाल देशपांडे यांना तत्काळ मुख्याधिका-याला कारणे दाखवा नोटीस पाठविण्याचे निर्देश दिले.

जनता दरबारात गोंधळ घातल्याने काँग्रेस पदाधिकारी स्थानबध्द

बाभूळगाव नगर पंचायतमधील पाणी पुरवठा योजनेचा मुद्या सुरू असताना जनता दरबारात नगर पंचायत उपाध्यक्ष तथा पाणी पुरवठा सभापती श्याम जगताप यांनी गोंधळ घालून व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. त्यांना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मोहन बनकर यांनी तालुक्याच्या समस्या आधी सोडवा असे म्हणत व्यासपीठाकडे धाव घेतली. त्यावेळी भाजपा जिल्हाउपाध्यक्ष प्रकाश भुमकाळे यांनी मध्यस्थी करून ईथे गोंधळ घालू नका हा सुद्धा जनतेचा मुद्दा आहे असे म्हणत वाद शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र जनतेच्या प्रश्नावर गोंधळ घालणा-या काँग्रेस पदाधिका-यांवर उपस्थित नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केल्याने पोलीसांनी दोनही पदाधिका-यांना ताब्यात घेवून स्थानबध्द केले.

पंधरा दिवसांचे आत नगर पंचायतचा आढावा घेवु….ना.डाॅ. अशोक उईके

बाभूळगाव नगर पंचायतच्या मुख्याधिका-यांच्या बेजबाबदारपणावर आक्रमक झालेल्या येथील नागरिकांनी नगर पंचायतच्या समस्या सोडविण्यासाठी बैठक लावण्याची मागणी केली. यावेळी परिस्थितीचे गांभिर्य बघता डाॅ. उईके यांनी पंधरा दिवसांचे आत नगर पंचायतची स्वतंत्र आढावा बैठक घेण्याचे आश्वासन दिले. यातून मुख्याधिका-यांशी संबंधीत अनेक कामकामाजा आढावा घेवून तपासणी करू, असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

spot_img