
बाभूळगाव तालुक्यात शिवसेनेची सदस्य नोंदणी !
23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान राबविले शिवकार्य अभियान
-:बाभूळगाव । प्रतिनिधी:-
आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून शिवसेना पक्ष बांधणीच्या उद्देशाने जिल्ह्यातील पदाधिका-यांनी कंबर कसली आहे. पक्षाला बळकटी मिळावी यासाठी पक्ष संघटन महत्त्वाचे आहे. त्या अनुशंगाने बाभूळगाव तालुक्यात शिवकार्य शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती 23 जानेवारी ते शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवस 9 फेब्रुवारी पर्यंत राबविण्यात आले.
सदस्य नोंदणी साठी तालुका व शहर शिवसनेनेच्या वतीने विविध ठिकाणी स्टाॅल लावण्यात आले होते. तसेच पदाधिकार्यांच्या माध्यमातून गावागावात सदस्य नोंदणी करण्यात आली. त्यामध्ये शहरातून 178 तर तालुकयातून जवळपास 2000 सदस्यांची नोंदणी या कालावधीत करण्यात आली आहे. शिवसेना नेते मृद, जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री ना. संजय राठोड, जिल्हा संपर्क प्रमुख हरिहर लिंगणवार, जिल्हा प्रमुख श्रीधर मोहोड यांच्या मार्गदर्शनात उपजिल्हा प्रमुख सचिन महल्ले, शहर प्रमुख प्रविण लांजेकर यांनी सदस्य नोंदणी अभियान राबविले. या अभियानाच्या यशस्वीतेसाठी तालुका संघटक विजय भेंडे, माजी उपनगराध्यक्ष रविंद्र काळे, नगर सेवक अभय तातेड, चंद्रकांत बोरकर, नरेश सातपुते, स्वप्नील मुडे, चेतन गावंडे, प्रसिध्दी प्रमुख विक्रम ब-हाणपुरे, युवसेना तालुका प्रमुख नितीन महालगावे, धनराज शिंदे, हेमराज शिंदे, युवसेना शहर प्रमुख सतीश जांभूळकर, नंदू लांडे, सचिन मालखेडे, मोहन कुकडे, महिला आघाडी तालुका प्रमुख अपर्णा वानोडे(लाकडे), सपना एकलारे, हलीमा शेख, सोनाली गायकवाड, ज्योती चचाने, हेमलता काळे आदिंसह तालुका व शहरातील शिवसैनिकांनी परिश्रम घेतले.