Homeमहाराष्ट्रबाभुळगावबाभूळगाव कृ.उ.बाजार समिती सभापतीपदी दिनेश गुल्हाणे अविरोध

बाभूळगाव कृ.उ.बाजार समिती सभापतीपदी दिनेश गुल्हाणे अविरोध

बाभूळगाव कृ.उ.बाजार समिती सभापतीपदी दिनेश गुल्हाणे अविरोध

बाभूळगाव । प्रतिनिधी:-

कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाची निवडणूक दि. 11 फेब्रुवारी रोजी बाजार समितीच्या सभागृहात दुपारी 1 वाजता घेण्यात आली. यात बाजार समितीच्या सभापतीपदी महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसचे उमेदवार दिनेश गुल्हाणे यांची एकमताने निवड करण्यात आली. विरोधी संचालकाने नामांकन अर्ज मागे घेतल्याने दिनेश गुल्हाणे यांची अविरोध निवड झाल्याचे अध्यासी अधिकारी तथा सहायक निबंधक आर.एन. मदारे यांनी जाहीर केले.

बाजार  समितीच्या सभापतीपदाचा राजेंद्र पांडे यांनी 27 जानेवारी रोजी राजीनामा दिला होता. तेव्हापासून सभापतीपदावर दावेदारीसाठी अनेक नावे पुढे आली होती. मात्र नामांकन भरण्याआधी काँग्रेससह मित्र पक्षांनी बाभूळगाव शहरात बैठक घेवून एकमताने एकच नामांकन दाखल करण्याचे ठरविल्याने दिनेश गुल्हाणे यांनी नामांकन अर्ज सादर केला. तर विरोधी संचालकांपैकी भाजपाच्या विवेक परडखे यांनी नामांकन दाखल केले. मात्र त्यांनी नामांकन अर्ज मागे घेतल्याने मतदान प्रक्रीया टळली. त्यामुळे एकच अर्ज दाखल असल्याने दिनेश गुल्हाणे यांची सभापतीपदी निवड करण्यात आली आहे. यावेळी त्यांचे माजी सभापती राजेंद्र पांडे, उपसभापती डाॅ. रमेश महानूर, संचालक नरेंद्र कोंबे, अमोल कापसे, आशिष सोळंके, अतुल राऊत, प्रज्वल राऊत, अॅड. गजेंद्र कडूकार, सतीश मानलवार, विवेक परडखे, श्रीमती आशा ठाकरे, सौ. ज्योती गावंडे, बबन बोमले, प्रविण वाईकर, रमेशपंत बहाड, शेख अयुब, शेख फिरोज, सचिव विलास गायकवाड आदिंनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

spot_img