
बाभूळगाव शहरात श्रीराम जन्मोत्सव निमित्त विविध कार्यक्रम
‘स्वर्गरथ’ शववाहिनी जनतेच्या सेवेत दाखल
बाभूळगाव । प्रतिनिधी
श्रीराम नवमी उत्सव समिती बाभूळगाव, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, मातृशक्ती, दुर्गावाहिनीच्या संयुक्त विद्यमाने बाभूळगाव शहरात गुढीपाडवा ते श्रीराम नवमी पर्यंत उत्सव साजरा करण्यात येत आहे. या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २ एप्रिल रोजी सकाळी स्वर्गरथाचे लोकार्पण करण्यात आले असून हा स्वर्गरथ(शव वाहिनी) जनतेच्या सेवेत दाखल झाला.
शववाहिनीचा लोकार्पण सोहळा स्थानिक भारतमाता चौक येथे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा उद्योजक सुधाकर ठाकरे हे होते. तर उद्घाटक म्हणून एकनिल रक्तपेढीचे संचालक सागर तोडकर, प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपनिरीक्षक धरमसिंग उईके, केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय पिंपळखुटे, जिल्हाध्यक्ष पंकज नानवानी, विहिंप विदर्भ प्रांत प्रमुख राम लोखंडे, मातृशक्ती जिल्हा सेवा प्रमुख मंगला चन्ने, अनिल खोडे, संजय खोडे आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन मयुर पिसे यांनी तर संचालन सागर सोनवणे यांनी केले. यावेळी नगर सेवक अभय तातेड, गटनेता अनिकेत पोहोकार, मिलींद नवाडे, ललिता वर्मा, नेहा बहाळे, रुपाली फुलकर, अनु दामेधर, हासरी चन्ने, वैष्णवी बारेकर, हेमंत बोरकर, प्रसाद यवतीकर, गजानन चन्ने, मयुर शर्मा, योगेश वानोडे, पांडुरंग मोने, जीवन शर्मा, गंगाधर वानोडे, वैभव लेंडे, संतोष गुप्ता, सचिन लांजेकर, आकाश श्रुंगारे, तुषार गुप्ता, विवेक बुरेवार उपस्थित होते.
बाभूळगाव शहराचे वातावरण भक्तीमय
श्रीराम नवमी उत्सवानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये गुढी पाडव्याला मोफत आरोग्य तपासणी, त्यानंतर ठिकठिकाणी हनुमान मंदिरात सामुहिक महाआरती, युवा वर्गासाठी छावा चित्रपटाचे प्रक्षेपण, पाणपोईचे उद्घाटन, शववाहिनीचे लोकार्पण, यानंतर ४ एप्रिल रोजी रक्तदान शिबीर, ५ एप्रिल रोजी सामुहिक हनुमान चालिसा पठण व मोटार सायकल रॅली, ६ एप्रिल रोजी सकाळी लोकसहभागातून स्वच्छता अभियान, त्यानंतर श्रीराम जन्मोत्सव शोभा यात्रा यासह सातही दिवस पहाटे रामजप प्रभात फेरी असे भरगच्च कार्यक्रम आयोजित केले आहेत. या उत्सवामुळे बाभूळगाव शहराचे वातावरण भक्तीमय झाले आहे.
Ok