बाभूळगाव नगर पंचायतची घनकचरा व्यवस्थापन निविदा रद्द करा !
— सुमेध वासनिक यांची जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार
बाभूळगाव | प्रतिनिधी :- नगर पंचायत बाभूळगाव अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन कामाच्या दि. २८ ऑगस्टला निवीदा प्रसिध्द करण्यात आली. सदर निवीदेमध्ये काही जाचक अटी व शर्ति नगर पालिके मार्फत टाकण्यात आल्या आहेत. जेणे करून यामध्ये इतर कंत्राटदार सहभाग घेवू शकणार नाही. हाच प्रकार मागील वर्षी सुध्दा घडविण्यात आला आहे. एकच निवीदा तीन वेळा प्रकशित करण्यात येते व त्यात फक्त एकच कंत्राटदार एकलव्य ट्रेडिंग कंपनी सहभाग देवू शकतो व घेतो. या प्रकाराची पुनरावृत्ती याही वर्षी होत आहे. यामुळे इतर कंत्राटदार यांना या निवीदेमध्ये भाग घेता येत नाही आहे. शासन निर्णयनुसार सदर कामाचा अनुभव असणारा कंत्राटदार यामध्ये सहभाग घेवू शकतो. तरी कारण नसतांना जाचक अटी व शर्ति टाकून इतर कंत्राटदार यांना निवीदे प्रक्रियेतून डावलल जात आहे. नगर पंचायत बाभूळगाव अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन कामाची निवीदा विशिष्ट कंत्राटदारांना देण्याकरीता करण्यात आलेली असून ती रद्द करावी. सदर होणा-या प्रकाराकडे जिल्हाधिकारी यांनी गांर्भियाने लक्ष देवून इतर कंत्राटदार यांना न्याय मिळवून दयावा, अशी मागणी अर्जातून स्वच्छ भारत स्वयरोजगार सेवा सहकारी सस्था,यवतमाळ अध्यक्ष सुमेध रविचंद्र वासनिक यांनी केली आहे.