…. पोळ्याच्या दिनी झडत्यांची लोकसंकृती, बैलाला गेरू, मटाक्या, घुंगराचा साज, ग्रामीण भागात उत्साह.
प्रतिनिधी | बाभुळगाव
एक नमन गौरा परबती,हर बोला हर हर महादेव अशा झडत्यांचे स्वर ग्रामीण भागात ठिकठिकाणी कानावर पडत होते. याद्वारे तालुक्यातील लोकसंस्कृतीचेही दर्शन घडले. बैलजोड्यांना गेरूने रंगवून, बाशिंग, झुल, गळ्यात घंटा, घुंगरू, मटाक्यांद्वारे सजवण्यात आले होते. या पोळ्यात ढोल-ताशांच्या गजरात वाजत गाजत बैलजोड्यांनी प्रवेश केला. त्यावेळी त्यांची ऐट बघण्यासारखी होती. हरहर महादेव, असा गजर कानी पडत होता. आनंदी व उत्साही वातावरणात ग्रामीण
गावाच्या दक्षिण टोकावर बकरी बाजार परिसरात यंदा बैलपोळा साजरा झाला.
शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे पोळा. वर्षभर शेतात राबराब राबणाऱ्या बैलांची पिठोरी अमावस्येच्या दिवशी पूजा करून त्याच्याबद्दल आदर व्यक्त करण्यात आला. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांच्या खांदे शेकणीचा कार्यक्रम झाला. बैलांचे खांदे तूप किंवा तेल, हळद लावून शेकण्यात आले. ‘आज आवतण घ्या, उद्या जेवायला या’ या शब्दात बैलांना पोळ्याचे आमंत्रण देण्यात आले होते ‘वाटी रे वाटी खोबऱ्याची वाटी, महादेव रडे दोन पैशासाठी, पारबतीच्या लुगड्याले छप्पन गाठी. देव कवा धावला गरिबांसाठी’ एक नमन गौरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव, -हर महादव असा गजर पोळ्याच्या पूर्वसंध्येपासून सुरू झाला.यावेळी पोळ्याचा आनंद शेतकऱ्यांसाठी सुखदायक होता. या पारंपरिक सणाचे स्वरूप बदलत असले तरी ग्रामीण भागात पोळ्याच्या दिवशी ‘गणा रे गणा, गण गेले वरच्या राणा, वरच्या राणातून आणली माती, ते दिली गुरूच्या हाती, गुरूनं घडवला महानंदी, तो नेला हो पोळ्यामंदी, एक नमन गौरा पारबती, हर बोला हर-हर महादेव’, अशा झडत्यांची लोकसंस्कृती आजही कायम असल्याचे दिसून आले. या ‘झडत्या’ म्हटल्या नाही तर पोळ्याचा आनंदच द्विगुणित होत नाही असे म्हटले जाते.
चौकट……Har har mahadev..
पुरणपोळीचा नैवेद्य
सूर्यास्ताच्या वेळी गावाबाहेरील मोकळ्या जागेवर आम्रपानांच्या तोरणाखाली बैलजोड्यांना रांगेत उभे करण्यात आले होते. गावातील मान्यवर व्यक्तींचा मानाचा बैल येईपर्यंत पोळा फुटत नाही. या बैलजोड्यांची पूजा केली. दरम्यान झडत्यांचा दुय्यम सामना सुरू झाला. तो आटोपल्यावरच पोळा फुटला. बैलजोड्यांचे पूजन करून आरती ओवाळली. नंतर त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला. बैलजोडीच्या मालकांना दक्षिणा देण्यात आली.
चौकट….
नगर पंचायत कडून बक्षीस वितरण.
नगर पंचायत कडून बक्षीस वितरण.
सुदृढ बैल व बाशिंग सजावट या दोन भागात विभागणी करत प्रत्येकी तीन असे एकूण सहा बक्षीस बाभुळगाव नगर पंचायतीच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. यात बाशिंग सजावट विभागात प्रथम बक्षीस अन्सार बेग,द्वितीय सलीम शेख,तृतीय शेख आदम शेख करीम यांनी पटकाविले.तसेच सुदृढ बैल गटात ब्रम्हानंद इंगोले,किसन पिसे, प्रदीप नांदुरकर यांनी अनुक्रमे प्रथम,द्वितीय व तृतीय बक्षीस पटकाविले. सदर बक्षीस वितरण बाभुळगावचे पोलीस निरीक्षक लहुजी तावरे व नायब तहसीलदार दिलीप बदकी यांचे हस्ते पार पडले.यावेळी नगरसेवकांसह शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.नगर पंचायत कडून बक्षीस वितरण.सुदृढ बैल व बाशिंग सजावट या दोन भागात विभागणी करत प्रत्येकी तीन असे एकूण सहा बक्षीस बाभुळगाव नगर पंचायतीच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. यात बाशिंग सजावट विभागात प्रथम बक्षीस अन्सार बेग,द्वितीय सलीम शेख,तृतीय शेख आदम शेख करीम यांनी पटकाविले.तसेच सुदृढ बैल गटात ब्रम्हानंद इंगोले,किसन पिसे, प्रदीप नांदुरकर यांनी अनुक्रमे प्रथम,द्वितीय व तृतीय बक्षीस पटकाविले. सदर बक्षीस वितरण बाभुळगावचे पोलीस निरीक्षक लहुजी तावरे व नायब तहसीलदार दिलीप बदकी यांचे हस्ते पार पडले.यावेळी नगरसेवकांसह शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.