बाभुळगाव तालुक्यात होते किमात पाच हजार श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना.     प्रतिनिधी | बाभुळगाव

बाप्पांच्या आगमनाला अवघे दोन दिवस शिल्लक असल्यामुळे सध्या शहरातील मूर्तीकारांकडे श्रीगणेशाच्या मूर्ती बघून निवडून ठेवण्यासाठी भाविकांची बालगोपालांसह गर्दी होत आहे. त्यातही आम्हाला मातीच्याच पर्यावरणपूरक श्रींच्या मूर्ती हव्यात अशी मागणी प्रकर्षाने केली जात आहे. पीओपीच्या मूर्ती सुबक, नक्षीदार दिसत असल्या, त्यांची रंगसंगती उत्तम असली तरी त्यांच्याकडे सर्वसामान्यांचे फारसे लक्ष नसल्याचे दिसत आहे. शहरात श्रींच्या लहान-मोठ्या अशा एकूण सुमारे पाच  हजार मूर्तीची विक्री होते, अशी माहिती मूर्तिकार अन् विक्रेते नीलेश भागवत यांनी दिली.

शहरात ठिकठिकाणी श्रींच्या मूर्ती विक्रीसाठी दुकाने सजत असून प्रत्येक चौकात नागरिकांच्या मनात भरणारी मूर्ती ते पसंत करत आहेत. आपणही निसर्गाचे देने लागतो. त्यामुळे पर्यावरण पूरक आणि पंचतत्त्वांपासून निर्मित मूर्तीची स्थापना करणार असल्याची माहिती भाविकांनी दिली. मातीचे गणराय विसर्जित केल्यानंतर ती माती घरातील कुंड्यांसह झाडांमध्ये टाकली, तर त्याचा फायदाच होतो. त्यामुळे आम्ही यंदा मातीचे विघ्नहर्ता घरी आणून त्यांची स्थापना करणार, अशी माहिती भाविकांनी दिली. मातीच्या मूर्ती पीओपीच्या मूर्तीच्या तुलनेत महाग असल्या तरी चालतील. परंतु, आम्ही मातीच्याच मूर्ती विकत घेणार, अशी माहितीही भाविकांनी दिली. शहरातील पर्यावरणप्रेमी मूर्ती विक्रेते नीलेश भागवत हे मातीच्या मूर्तीसोबत पाटही भेट देत आहे.गेल्या काही वर्षांपासून स्वतः मूर्तीची विक्री करत असले तरी ते नागरिकांना पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश सातत्याने देत आहेत. अशा लहान-मोठ्या विक्रेत्यांसह शासन, प्रशासनाकडून केल्या जात असलेल्या जनजागृतीमुळे सध्या भाविकांमध्ये मातीची गणेश मूर्ती खरेदी करण्याचा कल वाढला आहे.                                                मातीच्या मुर्त्यांची प्रीबुकिंग

शहरातील अनेक कलावंतांकडे मातीच्या गणरायांच्या सुबक मूर्ती आहेत. काही १०० टक्के मातीच्या तर काही ७० टक्के मातीच्या मूर्ती असून, अशा मूर्तीची एक ते दीड महिना आधीच भाविकांनी बुकिंग करून ठेवली आहे. कोणी ५१ रुपये, तर कोणी १०१ रुपये देऊन बुकिंग केल्यामुळे या मूर्ती वेगळ्या काढून ठेवण्यात आल्या आहेत.शहरातील अनेक कलावंतांकडे मातीच्या गणरायांच्या सुबक मूर्ती आहेत. काही १०० टक्के मातीच्या तर काही ७० टक्के मातीच्या मूर्ती असून, अशा मूर्तीची एक ते दीड महिना आधीच भाविकांनी बुकिंग करून ठेवली आहे. कोणी ५१ रुपये, तर कोणी १०१ रुपये देऊन बुकिंग केल्यामुळे या मूर्ती वेगळ्या काढून ठेवण्यात आल्या आहेत.

श्रींच्या मूर्तीस अंतिम रूप देतांन मूर्तिकार मंगेश भागवत,बाभुळगाव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here