बाभूळगाव अज्ञात वाहनाच्या धडकेत शेतकऱ्याचे निधन.
प्रतिनिधी । बाभुळगाव.
बाभूळगाव घारफळ येथील रहिवाशी शेतकरी अतुल सुरेश थोटे वय 37 वर्ष हे आपल्या सासरवाडी वरून परत येत असताना देवगाव महमदपूरच्या दरम्यान अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने ते जागीच गत प्राण झाले. हा अपघात बुधवार दिनांक ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान घडला.
शेतकरी असलेले अतुल थोटे हे बुधवारला आपली सासरवाडी असलेल्या अमरावती जिल्ह्यातील कुऱ्हा गावी आपल्या दुचाकीने गेले होते. परतीच्या प्रवासात सायंकाळी घारफळ गावाकडे परत येत असताना त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच मरण पावले.