प्रताप विद्यालय बाभूळगाव येथे शिक्षकदिन उत्साहात साजरा
बाभूळगाव | प्रतिनिधी :- प्रताप विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बाभुळगाव येथे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती घोडे, तर प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक मनोज नगराळे, प्रमुख मार्गदर्शक देवेंद्र आत्राम, स्वयंशासन दिनाच्या मुख्याध्यापिका कु. अदिती गोडे, निहारिका बद्दर, सोनल राऊत,, वैष्णवी केसकर, स्वीनी रंगारी, कुमारी खान मंचावर उपस्थित होते. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनकार्याची माहिती आत्राम सर यांनी दिली. नवभारत साक्षरता अभियान याविषयीची संपूर्ण माहिती शिक्षक शशिकांत कापसे यांनी दिली. मुख्याध्यापिका स्वाती घोडे यांनी शिक्षकाचे आपल्या जीवनातील योगदान याविषयी मार्गदर्शन केले. तर नगराळे यांनी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी अफसा पठाण, अनुश्री झाटे तर आभार स्विनी रंगारी हिने मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रम प्रमुख शशिकांत कापसे आणि ज्योती गिरी यांनी परिश्रम घेतले. यावेळी सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.