दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा
लक्षवेधी देखाव्यान्नी यवतमाळकर मंत्रमुग्ध.
आज ठिकठिकाणी गणपतीची स्थापना केली जाते.प्रत्येक ठिकाणच्या गणेशाची एक विशिष्ठ ओळख आहे.त्याचा प्रमाणे यवतमाळचा नवसाला पावणारा आणि यवतमाळचा राजा म्हणून ओळख असलेल्या गणपतीची मारवाडी चौक येथे नवयुवक गणेश मंडळाकडून प्रतिष्ठापना करण्यात आली.तत्पूर्वी श्रींची मिरवणूक व स्वागतार्ह शोभायात्रा काढण्यात आली होती.या शोभायात्रेत शिवकालीन मर्दानी खेळाचे शौर्यपथक,जैसलमेर येथील राजस्थानी सामूहिक लोकनृत्य,लखनऊ येथील श्रीराम चलचित्र व वानर सेना अशा अनेक देखाव्यांनी यवतमाळकरांना मंत्रमुग्ध केले.