Homeशासकीय योजनालाडकी बहीण योजने व्यतिरिक्त सरकारच्या या आणखी चार योजनेतून मिळतात महिन्याला पंधराशे.

लाडकी बहीण योजने व्यतिरिक्त सरकारच्या या आणखी चार योजनेतून मिळतात महिन्याला पंधराशे.

दिव्य दृष्टी वृत्तसेवा:

या योजनेशिवाय सरकारच्या आणखी काही योजनाही आहेत, ज्याद्वारे महिलांना तसेच इतर दुर्बल घटकांना आर्थिक मदत मिळू शकते. या योजनांमधून देखील पंधराशे रुपये दरमहा मिळण्याची सोय आहे. त्या पुढील प्रमाणे.

 मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा पंधराशे रुपये आर्थिक मदत दिली जाते. जुलै २४ पासून सुरू झालेल्या या योजनेचा लाभ राज्यातील अनेक तरुणींना व महिलांना मिळत आहे. पण यासाठी पात्रतेची काही अटी आहेत, जसे की वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

१. संजय गांधी निराधार अनुदान योजना

या योजनेचा उद्देश समाजातील दुर्बल घटकांना आर्थिक सहाय्य देणे आहे. विधवा, दिव्यांग, गंभीर आजारग्रस्त, अनाथ, परित्यक्ता, अत्याचारित महिला, तसेच 35 वर्षांवरील अविवाहित निराधार स्त्रियांना या योजनेचा लाभ मिळू शकतो.

आवश्यक कागदपत्रे

अर्जाचा नमुना,वयाचा दाखला (18 ते 65 वर्षे), महाराष्ट्रातील 15 वर्षे कायमस्वरूपी रहिवासी असल्याचा पुरावा,मृत्यू दाखला (विधवा महिला असल्यास), दिव्यांग प्रमाणपत्र (किमान 40% दिव्यांगत्व असणे आवश्यक), उत्पन्नाचा दाखला (कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा 50,000 रुपये),आधार कार्ड, रेशनकार्ड, बँक पासबुक, रहिवासी दाखला, आणि अर्जदाराचा फोटो

अर्ज कुठे करावा?

तहसील कार्यालय, सेतु केंद्र किंवा https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/Login/Certificate वर अर्ज करता येईल.

२.श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना

65 वर्षांवरील निराधार वृद्धांना या योजनेचा लाभ मिळू शकतो.

आवश्यक कागदपत्रे

वयाचा दाखला (किमान 65 वर्षे), उत्पन्नाचा दाखला (कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा: 21,000 रुपये),आधार कार्ड, रेशनकार्ड, बँक पासबुक, आणि अर्जदाराचा फोटो

अर्ज कुठे करावा ?

तहसील कार्यालय, सेतु केंद्र किंवा https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/Login/Certificate वर अर्ज करता येईल.

३. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना

65 वर्षांवरील दारिद्र्यरेषेखालील वृद्धांना या योजनेचा लाभ मिळतो.

आवश्यक कागदपत्रे

वयाचा दाखला (किमान 65 वर्षे),दारिद्र्यरेषेचा दाखला,आधार कार्ड, रेशनकार्ड, बँक पासबुक, आणि अर्जदाराचा फोटो

अर्ज कुठे करावा?

तहसील कार्यालय, सेतु केंद्र किंवा https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/Login/Certificate वर अर्ज करता येईल.

४. इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना

18 ते 79 वयोगटातील 80% पेक्षा अधिक अपंगत्व असलेल्या लोकांना या योजनेचा लाभ मिळतो.

आवश्यक कागदपत्रे

अपंगत्वाचा दाखला,दारिद्र्यरेषेचा दाखला,आधार कार्ड, रेशनकार्ड, बँक पासबुक, आणि अर्जदाराचा फोटो

अर्ज कुठे करावा?

तहसील कार्यालय, सेतु केंद्र किंवा https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/Login/Certificate वर अर्ज करता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

spot_img